सोन्याच्या किंमतीत झाली विक्रमी वाढ, 10 ग्रॅम Gold चा दर 50 हजाराच्या टप्प्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय स्तरावर तेजी आल्याने आणि रुपया घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितले की, बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७२३ रुपयांनी वाढून ४९,८९८ रुपये झाले. मंगळवारी सोन्याचे दर १० ग्रॅम ४९,१७५ रुपये होते. त्याचबरोबर चांदीची किंमत १०४ रुपये प्रति किलोने खाली आली आहे. आज चांदीचा दर ५०,५२० रुपये किलो झाला आहे.

सोन्याचे नवीन भाव
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी ९९.९ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ४९,८९८ रुपये प्रति १० ग्रामने वाढून ४९,१२६ रुपये झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत १,८०० डॉलर प्रति औसवर गेली आहे.

चांदीचे नवीन भाव
बुधवारी दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीची किंमत ५०,५२० रुपयाने घसरून ५०,८२२ रुपये झाली आहे.

कोरोना काळात गुंतवणूकदारांनी Gold ETF मध्ये लावले ८१५ कोटी
कोरोना व्हायरस संकटामुळे स्टॉक मार्केटमधील चढ-उतारा दरम्यान मे महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये ८१५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. यामागचे कारण असे की, गुंतवणूकदार आता सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांकडे वळत आहेत. या श्रेणीत गेल्या वर्षभरात इतर मालमत्तांपेक्षा चांगली कामगिरी दिसली आहे. ऑगस्ट २०१९ पासून गोल्ड ईटीएफमध्ये एकूण ३,२९९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मे गोल्ड ईटीएफमध्ये शुद्ध गुंतवणूक ८१५ कोटी रुपये आहे. एप्रिलमध्ये त्यात ७३१ कोटींची गुंतवणूक झाली होती. मार्चमध्ये मात्र १९५ कोटी रुपये काढले होते. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये यात १,४८३ कोटी रुपये आणि जानेवारीत २०२ कोटींची गुंतवणूक झाली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यात २७ कोटी रुपये आणि नोव्हेंबरमध्ये ७.६८ कोटी रुपये गुंतवणूक झाली होती. ऑक्टोबरमध्ये गुंतवणूकदारांनी या श्रेणीतून ३१.४५ कोटी रुपये काढले होते.

सोन्यातून कमाई करणे झाले सोपे
वर्ष २०१३ नंतर लोकांमध्ये फिजिकल सोन्याशिवाय इतर पर्यायांमध्येही पसंती दिसली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांकडे फिजिकल सोन्याव्यतिरिक्त पेपर सोन्यात गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर सोन्यातील गुंतवणूकीच्या कमाई व्यतिरिक्त लोकांना गोल्ड डिलिव्हरीचा पर्यायही मिळत आहे. गुंतवणूकदारांव्यतिरिक्त सामान्य लोकही पेटीएम गोल्ड, सॉवरेन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ यासारख्या गुंतवणूकीच्या पर्यायांचा पुरेपूर फायदा घेत आहेत. एमसीएक्स गोल्ड गुंतवणूकदारांना किमान १ ग्रॅम सोने खरेदी करण्याचा पर्याय देत आहे. एमसीएक्स सोन्यातील या गुंतवणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या डिमॅट खात्यात किमान १ ग्रॅम सोनेही ठेवता येईल. आवश्यक असल्यास त्याची डिलिव्हरी देखील घेतली जाऊ शकते.