50 हजार रूपयांच्या पुढं गेला सोन्याचा भाव, 1275 रूपयांनी चांदी महागली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर आज दुसर्‍या दिवशी सुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमतीमध्ये तेजी नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 232 रुपयांपर्यंत वाढला. सोबतच आज चांदीच्या किमतीत 1,275 रुपये प्रति किलोग्रॅमची उसळी नोंदली गेली. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा दोन्ही किमती धातुंचे दर तेजीत होते.

सोन्याचे नवे दर

कोरोना व्हायरस महामारीमुळे वाढत असलेल्या अनिश्चिततेदरम्यान आज सोन्याचे भाव 232 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढले, ज्यानंतर नवा दर 50,184 रुपये झाला आहे. यापूर्वी बुधवारी सोन्याचा दर 49,952 रुपयांच्या स्तरावर बंद झाला होता. अंतरराष्ट्रीय बाजरात सोन्याचा भाव वाढून 1,813 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे.

चांदीचे नवे दर

सोन्यासह आज दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली. आज चांदी 1,275 रुपये प्रति किलोग्रॅम महाग होऊन 52,930 रुपयांवर पोहचली आहे. बुधवारी चांदीचा भाव 51,655 रुपये होता. अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 18.94 डॉलर प्रति औंसवर पोहचला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अ‍ॅनलिस्ट कमोडिटीज तपन पटेल यांनी सांगितले की, आज कोरोना व्हायरस महामारीबाबत वाढत्या अनिश्चितेमुळे गुंतवणुकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पहात आहेत. याच करणामुळे अंतरराष्ट्रीय बाजारासह स्थानिक बाजारात तेजी दिसून येत आहे.

आर्थिक अनिश्चिततेमुळे गोल्डला मिळाला सपोर्ट

यामधील एका एक्सपर्टचे म्हणणे आहे की, अंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने जागतिक ग्रोथचा अंदाज घटवला आहे आणि म्हटले आहे की, सध्याच्या महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांची स्थिती खुप वाईट आणि चिंताजनक होईल. आयएमएफच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत 4.9 टक्क्यांची घसरण येईल. याच कारणामुळे सोन्याच्या किमतीत सतत तेजी दिसून येत आहे.

आर्थिक संकटाबाबत काय सांगतात आकडे?

सध्याच्या महामारीबाबत स्पष्ट चित्र दिसत नाही की, अखेर ती कधी संपणार. दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक सुद्धा येत आहे. या दोन्ही कारणामुळे सोन्याला सपोर्ट मिळेल. 2001 आणि 2008 च्या आकड्यांवरून समजते की आर्थिक संकटानंतर गोल्डच सर्वात पहिला असेट क्लास होता, ज्यामध्ये मोठी तेजी आली होती.

गोल्डद्वारे कमाई करणे झाले सोपे

2013 च्यानंतर लोकांमध्ये फिजिकल गोल्डशिवाय दुसर्‍या पर्यायांमध्येही उत्सुकता दिसून आली आहे. याचे सर्वात मोठे कारण आहे की, लोकांना फिजिकल गोल्डशिवाय इतर पेपर गोल्डमध्ये गुंतवणुकीचे पर्याय मिळत आहेत. एवढेच नव्हे, सोन्याच्या गुंतवणुकीतून कमाईसह लोकांना गोल्ड डिलिव्हरीचा पर्यायसुद्धा मिळत आहे. गुंतवणुकदारांशिवाय सर्वसामान्य लोक सुद्धा पेटीएम गोल्ड, सॉवरेन गोल्ड बॉन्ड, गोल्ड ईटीएफ सारख्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा भरपूर फायदा उचलत आहेत.

एमसीएक्स गोल्ड गुंतवणुकदारांना कमीतकमी 1 ग्रॅम सोने खरीदी करण्याचा पर्याय देत आहे. एमसीएक्स गोल्डमध्ये गुंतवणुकीची खास बाब ही आहे की, किमान 1 ग्रॅम सोने सुद्धा आपल्या डिमॅट खात्यात ठेवता येते. गरज पडल्यास याची डिलिव्हरीसुद्धा घेता येते.