खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात ‘मोठी’ घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या चांदीच्या किंमतीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी घट झाली आहे. रुपया मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 182 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. चांदी थोडी थोडकी नाही तर 1,083 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्याचे दर –
लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 41,201 रुपयांवरुन 41,019 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मंगळवारी सोनं 162 रुपयांनी स्वस्त झालं होतं. सोमवारी सोन्याच्या किंमतीत तेजी आली होती.

चांदीचे दर –
चांदी स्वस्त झाल्याने 46,610 रुपये झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,568 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 117.47 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

सोन्याचा लिलाव –
मण्णापुरम फायनान्स 3 राज्यात उत्तर प्रदेश, हरियाणा आणि झारखंडच्या विविध शहरात 17 फेब्रुवारीला 10 वाजता लिलाव करणार आहे. सोन्याच्या लिलावासाठी 50 केंद्र निवडले गेले आहेत. हरियाणा, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये कंपन्यांनी हे सेंटर बनवले आहेत. यात रांची, गुरगाव, रोहतास, बोकारो, धनबाद, हजारीबाग, जमशेदपूर, आगरा, गौतम बुद्ध नगर, फरीदाबाद आणि मेवातचा समावेश असेल.

10 हजार रुपये देणे आवश्यक –
सोन्याच्या लिलावामध्ये भाग घेणाऱ्यास 10 हजार रुपये सिक्युरिटी मनीच्या रुपात जमा करावे लागतील. जर तुम्ही लिलावामध्ये अपयशी ठरलात तर ते 10 हजार रुपये तुम्हाला परत मिळतील. याशिवाय सोन्याच्या लिलावात भाग घेतल्यानंतर बोली लावणाऱ्यांना पॅन कार्ड आणि आयडी प्रुफ द्यावे लागेल. यानंतर ते बोलीत भाग घेऊ शकतील.

फेसबुक पेज लाईक करा