‘संक्रांती’च्या दिवशी सोनं-चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी वाढल्याने बुधवारी सोन्याच्या किंमतीत मोठी तेजी आली आहे. बुधवारी दिल्ली सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव 256 रुपयांनी वाढले. सोन्या बरोबरच चांदीच्या किंमतीत देखील तेजी आली आहे. एक किलोग्रॅम चांदी 228 रुपयांनी महागली. HDFC सिक्योरिटीजच्या मते अमेरिका-चीन व्यापार करार विचारात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे.

सोन्याचे दर
बुधवारी दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 40,185 रुपयांवरुन 40,441 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी आली आहे. सोनं 1,552 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले, तर चांदी 17.83 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.

चांदीचे दर 
सोन्याबरोबर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. बुधवारी एक किलोग्रॅम चांदीच्या किंमती 47,044 रुपयांनी वाढून 47,272 रुपये झाल्या.

का आली सोन्या चांदीच्या किंमतीत तेजी
HDFC सिक्योरिटीजचे सीनिअर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की अमेरिकी अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले की या करारात चीनच्या अरबो डॉलरच्या सामानावर लावण्यात येणारे शुल्क परत घेता येणार नाही. अमेरिका आणि चीन पहिल्या टप्प्याच्या व्यापार करारावर हस्ताक्षर करेल. अमेरिका चीनने व्यापार कराराबाबात शंका असल्याने गुंतवणूकदार सोन्या चांदीत गुंतवणूक करत आहेत.

आजपासून बदलणार सोन्यासंबंधित नियम
आजपासून सोन्याच्या दागिण्यावर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासंबंधित प्रक्रिया सुरु होईल. त्यानंतर निर्मात्यांना आपल्या संस्थांचे नाव नोंदवावे लागेल. हॉलमार्किंग म्हणजे तुमच्या दागिण्यात किती सोने आहे आणि इतर धातूचे प्रमाण किती आहे. नव्या नियमांतर्गत आता सोन्याच्या दागिण्याची हॉलमार्किंग होणे अनिवार्य असेल. त्यासाठी सराफांना परवाना घ्यावा लागेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/