Gold-Silver Rates Today | …म्हणून सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किंमतीत तब्बल 3 हजार रूपयांची घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Rates Today | रशिया आणि यूक्रेनदरम्यान काल सुरू झालेल्या युद्धाचा (Russia Ukraine War 2022) आज (शुक्रवार) दूसरा दिवस आहे. रशियाने यूक्रेनची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. या युद्धाचा परिणाम भारतात सुद्धा शेयर बाजारासह सोने-चांदीच्या दरावर (Gold-Silver Rates Today) पडला आहे. गुरुवारी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली, ज्यानंतर आज किंमतीत घट झाली आहे.

 

सोने-चांदी शुक्रवारी स्वस्त झाले आहे. भारतीय सराफा बाजारात जारी केलेल्या दरानुसार, 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने स्वस्त होऊन 50868 रुपयात विकले जात आहे, तर एक किलो चांदीचा दर 65165 रुपयांवर आला आहे.

 

सोने-चांदीचे दर रोज जारी केले जातात. एकदा सकाळी आणि दुसर्‍यांदा दुपारी दर जारी होतात. ibjarates.com नुसार, 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 50664 रुपयात विकले जात आहे. तर 916 शुद्धतेचे सोने 46595 रुपयांवर आले आहे. याशिवाय, 750 शुद्धतेचे सोने 38151 रुपयांत मिळत आहे. 585 शुद्धतेच्या सोन्याचा दर 29758 रुपये झाला आहे. याशिवाय, 999 शुद्धतेची चांदी सुद्धा कमी होऊन 65165 रुपयांवर आली आहे. (Gold-Silver Rates Today)

किती बदलले सोने-चांदीचे दर?
रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाच्या दुसर्‍या दिवशी आज सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
चांदीचा दर सुमारे 3000 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1672 रुपये कमी झाला आहे.
995 शुद्धतेचे सोने 1666 रुपयांनी कमी झाले आहे.

 

तर, 916 शुद्धतेचे सोने आज 1532 रुपयांनी कमी झाले. तसेच, 750 शुद्धतेचे सोने 1254 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
याशिवाय, 585 शुद्धतेच्या सोन्याचा दर सुद्धा आज कमी झाला आहे. आज ते 978 रुपयांनी स्वस्त होऊन 29758 रुपयांनी विकले जात आहे.
तर, चांदीच्या किंमतीत मोठी घसरण नोंदली गेली आहे. तिचा दर 2984 रुपयांनी कमी झाला आहे.

 

Web Title :- Gold-Silver Rates Today | gold silver price today decreased russia ukraine war second day updates 25 feb sona chandi bhav bullion gold silver latest rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police | राज्यातील हजारो पोलिसांसाठी खुशखबर ! पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; PSI बनणार, शासन निर्णय जारी

 

Mrunal Thakur Video | ट्रोलर्सची नजर खिळली मृणाल ठाकुरच्या कंबरेवर, मृणालनं दिल ट्रोलर्सना सडेतोड उत्तर..

 

Deepika Padukone Tight Dress | दीपिका पादुकोणनं घातला अत्यंत टाईट ड्रेस; फोटो पाहून चाहते म्हणाले – ‘श्वास कशी घेतेस?’