2 दिवसानंतर आज सोन्याच्या भावात घट अन् चांदी देखील घसरली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एचडीएफसी सिक्युरिटीजने शुक्रवारी दिल्ली सराफा बाजाराच्या नवीन रेट्सची माहिती दिली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली आहे. मात्र आज चांदीच्या भावात घट नोंदली गेली आहे. याआधी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या भावात घट नोंदली गेली आहे.

चांदीचे नवीन भाव

आदल्या दिवशी चांदी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आज त्यात घट नोंदली गेली आहे. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात आजचा चांदीचा भाव ३५२ रुपये प्रति किलोग्रॅम कमी झाला आहे. चांदीचा आजचा नवीन भाव ५२,३६४ रुपये प्रति किलोग्रॅम आहे. गुरुवारी हा भाव ५१,७१६ रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा नवीन भाव १८.६० डॉलर प्रति औसवर होता.

सोन्याचा नवीन भाव

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्यानंतर आता १० ग्राम सोन्याचा नवीन भाव ४९,९५९ रुपये झाला आहे. याअगोदर गुरुवारी सोन्याचा भाव ४९,९५१ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घट नोंदली गेली, त्यानंतर सोने १,८०० डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होते.

सोन्याच्या भावात सुधारणा

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, ‘अलिकडच्या काळात विक्रमी वाढ झाल्यानंतर सोन्याचा भाव आज सुधारला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही पिवळ्या धातूच्या किंमतीत घट झाली आहे.’

आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याला आधार मिळाला

या प्रकरणाशी संबंधित तज्ञाचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) जागतिक वाढीचा अंदाज कमी केला आहे आणि म्हटले आहे की सध्या असलेल्या महामारीमुळे जगातील अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी खराब आणि चिंताजनक असेल. आयएमएफच्या अंदाजानुसार, २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत ४.९ टक्क्यांनी घट होईल. यामुळेच सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.

आर्थिक संकटाबाबत काय सांगतात आकडे?

वास्तविक, सध्याची महामारी कधी संपेल हे स्पष्ट दिसत नाहीये. दुसरीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूकही येत आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही कारणांमुळे सोन्याला आधार मिळेल. २००१ आणि २००८ मधील आकडेवारीवरून असे दिसून येते की, आर्थिक संकटानंतर सोने हाच पहिला ऍसेट क्लास होता, ज्यामध्ये मोठी वाढ झाली होती.