सोन्याचा भाव पोहचला 50 हजाराच्या जवळ, चांदी 858 रूपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजीचा परिणाम आज दिल्ली बुलियन मार्केटमध्येही दिसून आला. आज, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या. एकीकडे पिवळ्या धातूची चमक (सोन्याचा दर) प्रति दहा ग्रॅम 120 रुपयांनी वाढली तर दुसरीकडे चांदीचा दर 858 रुपयांनी वाढला. जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोने-चांदीची मागणी वाढत आहे.

नवीन सोन्याचे दर (13 जुलै 2020 रोजी सोन्याची किंमत) – एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांनी वाढ झाली. यानंतर आता नवीन किंमत 49,960 रुपयांवर पोहोचली आहे. आदल्या दिवशी तो प्रति 10 ग्रॅम 49,840 रुपयांच्या पातळीवर बंद झाला.

नवीन चांदी किंमती (13 जुलै 2020 रोजी चांदीची किंमत) – चांदीच्या किंमतींमध्येही सतत वाढ दिसून येत आहे. सोमवारी चांदीच्या किंमतीत प्रति किलो 858 रुपयांची वाढ झाली, त्यानंतर आता नवीन किंमत 53,230 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी चांदीचा भाव 52,462 रुपयांवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर यातही सातत्याने वाढ होत आहे. नवीन सोन्याची किंमत 1,805 डॉलर प्रति औंस होती. तर चांदीची किंमत 19.03 डॉलर प्रति औंस होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, कोविड – 19 चे प्रकरण जगभरात वाढल्यानंतर सोन्याच्या किंमतीत वाढ होणार आहे. दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेत वाढत्या अनिश्चिततेच्या दरम्यान गुंतवणूकदार कमी जोखीम घेण्याच्या मनःस्थितीत आहेत. यामुळेच सोन्यावर त्यांचा विश्वास वाढत आहे.

सोन्याच्या कर्जाच्या व्याज ऑनलाईन भरण्यावर कॅशबॅक

मुथूट फायनान्सने कोविड-19 साथीच्या दरम्यान आपल्या ग्राहकांसाठी एक कॅथबॅक योजना मुथूट ऑनलाईन मनी सेव्हर प्रोग्राम (एमओएमएस) सुरू केली आहे. ऑनलाइन कर्जावर व्याज भरणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्ड लोन एनबीएफसीने एमओएमएस योजना सुरू केली आहे. याअंतर्गत आता ऑनलाइन व्याज भरणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. कोविड – 19 दरम्यान ग्राहकांमध्ये डिजिटल पेमेंटस प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

काय आहे ही योजना?

योजनेनुसार मुथूट फायनान्सचे ग्राहक कॅशबॅकमध्ये 1501 रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. ही योजना सध्या कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, परंतु 31 जुलैपूर्वी iMuthoot अॅपवर उपलब्ध होईल. ऑनलाइन पेमेंट करताना ग्राहकांना कॅशबॅकची रक्कम दर्शविली जाईल आणि देय व्याजातून ती रक्कम कमी करुन ते व्याज भरण्यास सक्षम असतील.