रेकॉर्डब्रेक ! सोन्याच्या दरात 300 रूपयांनी वाढ, जाणून घ्या आजचे दर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आज सोन्याने भाव पुन्हा भडकले. आता १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी ४० हजारांच्या आसपास रक्कम मोजावी लागणार आहे. आंतराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक मंदीच्या सावटाखाली सोन्याच्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून केल्या गेलेल्या मागणीमुळे बुधवारी दिल्ली सराफ बाजार मध्ये सोने ३०० रुपयांनी वाढून ३९९७० रुपये प्रति ग्रॅम होत एक नवीन उंची गाठली. अखिल भारतीय सराफ संघानुसार, जागतिक जागतिक कल आणि औद्योगिक एकके तसेच चलन निर्मात्यांच्या जोरदार मागणीमुळे चांदीची किंमत २११० रुपयांनी वाढून ४८८५० रुपये प्रति किलोग्राम पर्यंत पोहचली.

जाणून घ्या, का वाढत आहेत सोन्याच्या किमती
स्थानिक व्यापाऱ्यांची वाढती खरेदी. हे सोन्याचे भाव वाढण्याचे एक मुख्य कारण आहे. सोबतच सोन्याचे व्यापारी आणि विश्लेषकांनी असे सांगितले कि, एक तर विविध सणांचे दिवस आहेत. गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय म्हणूनही याकडे पहिले जाते. त्यामुळे सोने सोन्याचे भाव उच्चांक गाठत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर तसेच अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम यामुळे लोकं सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत.

सोनं ४०,००० च्या घरात
दिल्ली सराफ बाजार मध्ये ९९.९ प्रतिशत आणि ९९.५ शुद्ध सोन्याचे भाव वाढून क्रमशः ३९,९७० आणि ३९,८०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहचले. आठ ग्रॅमची गिन्नी सुद्धा ३०० रुपयांनी वाढून २९,८०० रुपये झाली.

चांदी पोहचली २१,११० वर
सोबतच चांदीची किंमत २,११० रुपयांनी वाढून ४८,८५० रुपये प्रती ग्रॅम झाली. तर साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी १,२८९ हुन वाढून ४६,४१६ रुपये प्रतिग्रॅम झाली. चांदी शिक्का लिवाल आणि बिकवाल २,०००-२,००० रुपये वाढून क्रमशः ९८,००० रुपये आणि ९९,००० रुपये प्रति शेकड्यावर राहिली.

आरोग्यविषयक वृत्त –