सलग पाचव्या दिवशी सोनं-चांदी ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या किंमतीत आजही घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतींत घसरण झाली आहे. बुधवारी 24 कॅरेट सोने 73 रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदी देखील 89 रुपयांनी स्वस्त झाली.

HDFC सिक्योरिटीचे सीनियर कमोडिटी अ‍ॅनालिस्ट तपन पटेल म्हणाले की डॉलरच्या कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. जगभरातील गुंतवणूकदार अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारावर लक्ष ठेवून आहेत. याची डेडलाइन 15 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.

सोन्याचे दर
बुधवारी दिल्लीत सराफ बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोने 73 रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे सोने 38,486 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर मंगळवारी सराफ बाजारात सोने 38,555 रुपयांनी घसरुण 38,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये बुधवारी सोने 1,464.8 डॉलर प्रति औंस होते. तर चांदी 16.62 डॉलर प्रति औंस झाले.

चांदीचे दर
बुधवारी एक किलोग्रॅम चांदीचे दर 44,729 रुपयांनी कमी होऊन 44,640 रुपये झाली. आज चांदी 89 रुपयांनी स्वस्त झाली.

सोन्याच्या दागिण्यांसाठी नवे नियम
सोन्याच्या दागिण्यांवर 15 जानेवारी 2020 पासून हॉलमार्किंग असणे अनिवार्य आहे. यासंबंधित सरकार 15 जानेवारी 2020 ला नोटीफिकेशन जारी करेल. त्यानंतर दागिण्यावर हॉलमार्किंग अनिवार्य असेल. परंतू सराफांना हा नियम लागू करण्यासाठी 1 वर्षांचा कालावधी मिळेल. बीआयएस कायद्यानुसार हॉलमार्किंगचे नियम मोडणाऱ्यांना कमीत कमीत 1 लाखाच्या दागिण्यावर 5 टक्के दंड आणि 1 वर्षांची शिक्षा मिळेल.

Visit : policenama.com