खुशखबर ! सोनं 1049 तर चांदी 1588 रूपयांनी झाली स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी येत असलेल्या वॅक्सीनच्या वृत्ताने जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री सुरू केली आहे. या करणामुळे स्थानिक बाजारातसुद्धा सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे दर 1049 रुपये आणि एक किलोग्रॅम चांदीचे दर 1588 रुपयांनी घसरले.

एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, कोरोना वॅक्सीन लवकर येण्याच्या शक्यतेने सोन्याच्या किमतीवर दबाव वाढला आहे. याशिवाय या महिन्यात गोल्ड ईटीएफच्या होल्डिंगमध्ये 10 लाख औंसची घसरण आली आहे. हा या गोष्टीचा संकेत आहे की, गुंतवणूकदार सोन्यातून हळूहळू होल्डिंग घटवत आहेत. परदेशी बाजारात सोन्याचे दर 4 महिन्यांच्या खालच्या स्तरावर आले आहेत.

सोन्याचा नवीन दर
राजधानी दिल्लीत आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,049 रुपयांनी घसरून 48,569 रुपयांवर आला आहे. यापूर्वी सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर भाव 49,618 वर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव 1,830 डॉलर प्रतिऔंसवर आला आहे.

चांदीचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात चांदी 1,588 रुपये स्वस्त झाली आहे. तिचा दर कमी होऊन 59,301 रुपये प्रतिकिलोग्रॅमच्या स्तरावर आला. यापूर्वी सोमवारी व्यवहाराच्या सत्रात चांदीचा भाव 60,889 रुपये प्रतिकिलो ग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात हा भाव 23.42 डॉलर प्रतिऔंस होता.

You might also like