Gold Silver Update | धनत्रयोदशीपूर्वी 49 हजार रुपयांच्या जवळपास पोहचू शकते सोने, जाणून घ्या काय आहे सर्वात मोठे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Update | सणासुदीचा काळ आणि लग्नसराईच्या मागणीमुळे आगामी काळात देशाच्या सोने आयातीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ दिसून येऊ शकते. अशीही सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच सोन्याच्या आयातीत सुद्धा वाढ होत आहे. सोन्याची आयात (import) एप्रिल-सप्टेंबर 2021 च्या दरम्यान सुमारे 24 अरब डॉलरपर्यंत पोहचली. (Gold Silver Update)

 

कशाप्रकारचे आकडे दिसत आहेत
जीजेईपीसीने म्हटले की, मागील सहा महिन्यादरम्यान आयातीमध्ये (Gold Import) चढ-उताराची प्रवृत्ती दिसून आली आहे आणि ती कोविडच्या पूर्वीच्या वर्षांच्या आकड्यांच्या बरोबर आले आहे. जीजेईपीसीने म्हटले की, मे (12.98 टन) आणि जून (17.57 टन)-2021 मध्ये सोन्याची आयात दुसर्‍या विध्वंसक कोविड लाटेने वाईटप्रकारे प्रभावित झाली, ज्यामुळे राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लागला. (Gold Silver Update) यामुळे रत्न आणि दागिन्यांसह उद्योग प्रभावित झाले. जीजेईपीसीने म्हटले की, आयात ऑगस्टमध्ये वाढली. महिन्यातील आयातीचा आकडा 118.08 टन होता. हा सोन्याच्या आयातीचा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे.

 

काय म्हणतात जाणकार
जीजेईपीसीचे चेयरमन कोलिन शाह यांनी म्हटले की, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेेंबर 2021 च्या दरम्यान आयातीत वाढ लॉकडाऊन हटवणे, स्थानिक आणि निर्यात मागणीत सुधारणा आणि सणासुदीच्या हंगामाला सुरूवात झाल्याने आहे. ज्यामुळे उत्पादनांच्या मागणीत मोठी वाढ झाली (Gold Silver Update) आहे. दुसरीकडे आयआयएफएलचे व्हाईस प्रेसीडेंट (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता यांच्यानुसार सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या किमतीत तेजी पहायला मिळत आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याचा दर 49 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहचू शकतो. तर दुसरीकडे इम्फ्लेशनमध्ये वाढ झाल्याने गुंतवणुकदारांचा कल सोन्याकडे जात आहे. ज्यामुळे किमतीत तेजीचे संकेत दिसत आहेत.

सोन्याच्या किमतीत वाढ (Gold Price Today)
मोठ्या हाजीर मागणीदरम्यान स्थानिक वायदा बाजारात बुधवारी सोन्याचा दर सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी 269 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 47,549 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा दर 47576 रुपये प्रति 10 ग्रॅमसह दिवसाच्या उच्च स्तरावर गेला. बाजार विश्लेषकांनी म्हटले, व्यावसायिकांनी ताज्या सौद्यांचा लिलाव केल्याने सोने वायदा किमतीत तेजी आली. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा दर 0.50 टक्केच्या तेजीसह 1,779.40 डॉलर प्रति औंस झाला.

 

चांदीच्या किमतीत वाढ (Silver Price Today)
मजबूत हाजीर मागणीमुळे व्यावसायिकांनी आपल्या सौद्यांचा आकार वाढवला ज्यामुळे वायदा व्यवहारात बुधवारी चांदीचा दर 65,000 रुपये प्रति किलोच्या पुढे गेला.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी चांदीचा दर 700 रुपयांनी वाढून 65,150 रुपये प्रति किलो झाला.
(Gold Silver Update) तर व्यवहाराच्या सत्रादरम्यान आज चांदी 65,240 रुपये प्रति किलोसह दिवसाच्या उच्च स्तरावर सुद्धा पोहचली.
जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये चांदीचा दर 0.41 टक्केच्या तेजीसह 23.98 डॉलर प्रति औंस झाला.

Web Title :- Gold Silver Update | gold can reach near rs 49000 before dhanteras know what is the biggest reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High Salary Jobs | देशात पुन्हा परतणार मोठ्या पगाराचा काळ ! सन 2022 मध्ये नोकरदारांना मिळेल 9.3 % पगारवाढ; कंपन्या सुद्धा करतील ‘बंपर’ नियुक्त्या

Prabhas | ‘राधेश्याम’ चित्रपटाचं नवीन पोस्टर झालं रिलीज, ‘प्रभास’च्या वाढदिवसादिवशी होणार ट्रेलर रिलीज

Aurangabad Crime | WhatsApp च्या ‘स्टेटस’वर ‘गुड बाय’ लिहून हिंगोलीच्या उच्चशिक्षीत तरूणाची औरंगाबादमध्ये आत्महत्या