डीआरआयकडून सोने तस्करीचे जाळे उध्द्वस्त, 16 कोटींच्या सोन्यासह 10 जणांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (DRI) केलेल्या कारवाईत देशातील सोने तस्करीचे मोठे जाळे उध्द्वस्त केले आहे. या कारवाईत डीआरआयने दहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 16 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 42 किलो सोने जप्त केले आहे. डीआरआयने ही कारवाई कोलकत्ता, रायपूर आणि मुंबईत केली.

दोन दिवसांपासून डीआरआयचे अधिकारी, कर्मचारी या कारवाईमध्ये गुंतले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा करवाई करण्यात आली. कोलकत्ता येथील गोविंद मालवीय, फिरोज मुल्ला या आरोपींच्या निवासस्थानी छापा टाकून 26.650 किलो सोने जप्त केले. हे सोने विदेशातून आणण्यात आले होते. यावेळी 552.030 ग्रॅम वजनाचे दागिने अधिकाऱ्यांना सापडले. याची किंमत 10 कोटी 57 लाख रुपये असून सीमाशुल्क कायद्याअन्वये सोने जप्त केले आहे.

या कारवाईत मालविया, मुल्ला, आण्णा राम, महेंद्र कुमार, सुरज मगाबुल, कैलाश जगताप, विशाल माने या सात आरोपींना अटक करण्यात आली. त्यावेळी केलेल्या चौकशीत गोविंद मालवीय याने दोन पार्सल समरस्ता एसएफ एक्सप्रेस रायपूर व एलटीटी कुर्ला एक्सप्रेसने मुंबईला पाठवल्याची माहिती दिली. त्यानुसार रायपूर येथून 8 किलो तर मुंबईतून 7 किलो सोने जप्त करण्यात आले. यावेळी गोपराम व मिलन कुमार, साहिल जैन यांना अटक केली. या आर्थिक वर्षात डीआरआयने पूर्व विभागात तब्बल 219 किलो सोने जप्त केले आहे.

Visit : Policenama.com 

 

You might also like