45 हजार रुपयांच्या खाली सुद्धा जाऊ शकतं सोनं, जाणून घ्या का घसरत आहेत दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यावर्षी गुंतवणुकदारांना मोठे रिटर्न दिलेले सोने आता झटका देऊ लागले आहे. कोरोनाची लस तयार झाल्याच्या बातम्या येऊ लागल्याने मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 1049 रुपयांच्या मोठ्या घसरणीसह 49 हजार रुपयांच्या स्तरापेक्षा सुद्धा खाली पोहचले. सोन्याचा दर 48569 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला आहे.

दिल्ली सराफा बाजारात सोने मंगळवारी 1,049 रुपयांच्या घसरणीसह 48,569 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा भाव 49,618 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटले की, कोविड-19 च्या लसीसंदर्भात आशा वाढल्याने आणि बायडेन यांच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळण्याच्या तयारीमुळे सोन्या किंमतीमध्ये घसरण दिसून आली. याशिवाय जागतिक बाजारात तेजीचे संकेत आणि रुपयाच्या विनिमय दरातील सुधारणेचा सुद्धा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.

या दरम्यान विक्री दबावामुळे चांदी सुद्धा 1,588 रुपयांच्या घसरणीसह 59,301 रुपये प्रति किलो ग्रॅमवर आली आहे. मागच्या सत्रात तिचा बंद भाव 60,889 रुपये प्रति किग्रॅ होता. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव हानीसह 1,830 डॉलर प्रति औंस राहीला. तर चांदी 23.42 डॉलर प्रति औंसवर जवळपास विनाबदल राहीली. एंजल ब्रोकिंगचे डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी म्हटले की, सोन्याने 49 हजारचा खालचा स्तर तोडला आहे, ज्यानंतर यामध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता वाढली आहे.

कोरोना लस तयार झाल्यानंतर 45 हजार रुपयांच्या सुद्धा खाली जाऊ शकते सोने : विशेषज्ञ

घसरणीची 4 कारणे
1. लस बनवण्याच्या जवळ कंपन्या पोहचल्या आहेत. आगामी काळात कोरोनाची भिती कमी झाल्याने सोने सुरक्षित गुंतवणुक राहणार नाही. यामुळे घसरण होत आहे.

2. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामुळे सुद्धा आशा वाढल्या आहेत. सत्ता सांभाळण्यासाठी त्यांनी वेगाने तयारी सुरूकेली आहे. यामुळे युद्ध थांबण्याची आशा व्यक्त केली जात आहे. जगभरात व्यापारी हालचाली वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक संकटाचे ढग दूर झाल्याने सोन्याची चमक ओसरत आहे.

3. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने सुधारणा होत आहे. यामुळे शेयरमध्ये गुंतवणुक लाभदायक ठरते. यामुळे गुंतवणुकदार सोन्याऐवजी शेयरकडे वळत आहेत. यामुळे सोने घसरत आहे.

4. एंजल ब्रोकिंगचे डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी म्हटले, कोरोना लस तयार झाल्यानंतर सोने 45 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा खाली गेले तर आश्चर्य वाटू नये. सध्या काळात सोन्यातील गुंतवणुकीपासून दूर राहणे आवश्यक आहे.

You might also like