Budget 2019 : बजेट नंतर लगेचच ‘या’ कारणामुळं सोन्याच्या किंमतीत ‘अव्वाच्या सव्वा’ वाढ ; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सराफांना दिलासा देण्यासाठी सोन्यावर लावल्या जाणाऱ्या करामध्ये कपात करणार असल्याचे सांगितले होते. मात्र यानंतर आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सोन्यावर लावले जाणारे शुल्क १० टक्क्यांवरून १२.५ टक्के असे वाढवले आहे. या घोषणेनंतर लगेचच बाजारातील सोन्याचे भाव ६०० रुपये प्रतितोळा इतके वाढले आहेत.

सीमा शुल्क आणि आयात शुल्क वाढल्यास संबंधित वस्तूंच्या किमतींमध्ये तात्काळ बदल होत असतात. त्यामुळेच दिल्लीच्या सराफा बाजारात ३३,७०० रुपये प्रति १० ग्राम असणारे सोन्याचे भाव बजेटनंतर लगेचच ३४,३०० रुपये इतके झाले. सराफांच्या म्हणण्यानुसार यामुळे विक्रीवर मोठा प्रभाव पडेल त्याचबरोबर ज्वेलरी क्षेत्रातील रोजगारावर देखील परिणाम होणार आहे.

शुल्क वाढल्याने सोन्याच्या तस्करीचा धोका वाढण्याची शक्यता :

सराफांच्या सांगण्यानुसार आता भारतातील आणि भारताबाहेर विकल्या जाणाऱ्या सोन्याच्या भावात १६ टक्क्यांचा फरक झाला आहे. १२.५ टक्के आयात शुल्क, ३ टक्के जीएसटी आणि अन्य शुल्क ०.५ टक्के इतके आहे. सगळे मिळून हे १६ टक्के होते. ज्या ज्या वेळी सोन्याच्या किमती १६ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तेव्हा प्रत्येक वेळी सोन्याची तस्करी वाढली आहे. ज्वेलर्स ने सांगितले की, आधी व्यापारी बँकांमधून सोने खरेदी करतात. तेच आता मागच्या रस्त्याने म्हणजेच तस्करीद्वारे खरेदी केले जाईल. सराफांच्या संघटनेने सांगितले कि हे शुल्क कमी करण्यासंदर्भात ते अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?