अरे बापरे ! सोन्याच्या दराने तोडले आतापर्यंतचे सर्व ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – परदेशात सोन्याचे भाव वधरल्याने दिल्लीच्या सराफ बाजारात देखील बुधवारी सोन्याच्या भाव १०६० रुपयांनी वधारले. आता पर्यंतच्या रेकॉर्ड केलेल्या सोन्याचे भाव ३७,९२० रुपये प्रति १० ग्रामवर पोहचले आहेत. स्थानिक बाजारात देखील सोन्याचे भाव ३७ हजारांवर पोहचले आहेत. यावर्षात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हे दुसऱ्यांदा होत आहे की एका दिवसात सोने १ हजार रुपयांपेक्षा आधिक वधारले. याआधी ६ जुलैला यात १,३०० रुपयांनी वाढ झाली होती. तर ११ जुलैला हे भाव ९३० रुपये आणि ५ ऑगस्टला ८०० रुपये प्रति १० ग्रामने वधारले होते.

संसदेत ५ जुलैला अर्थसंकल्पानंतर ३,७५० रुपयांनी महागले आहे. दिल्ली सराफ बाजारात चांदी आज ६५० रुपयांनी वाढून दोन मार्च २०१७ नंतर उच्चतम स्तरावर पोहचली असून चांदीचा भाव ४३,६७० रुपये प्रति किलोग्राम आहे.

व्यवसायिकांनी सांगितले की स्थानीय बाजारात आज सकाळपासूनच उलथापालथ दिसून येत होती. स्थानिक मागणी मंदावली आहे. परंतू परदेशात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजरात देखील सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडल्याने सोन्याचे भाव आणखीच महागले आहे. लंडनच्या बाजारात सोने १४.०५ डॉलरने वाढून १,४८७.३० डॉलर प्रति औंसवर पोहचले.

व्यापारादरम्यान एकदा सोने १,४८९.७६ डॉलर प्रति औंस पोहचला जे एप्रिल २०१३ नंतर सर्वात जास्त दर आहे. मंगळवारी देखील यात ०.७ टक्के वाढ झाली होती. बाजार विशेषज्ञानुसार अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like