‘इथं’ 2 नद्यांमधून मिळतं सोनं, आता तर साठा मिळण्याची शक्यता

छत्तीसगढ : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या जशपूरमध्ये सोन्याची खाण मिळण्याची शक्यता आहे. इथल्या दोन नद्यांमध्ये शतकानुशतके सोन्याचे कण सापडत आहेत, आता येथे सोन्याच्या खाणींचे सर्वेक्षण करण्याची बाब समोर येत आहे.

ही अद्याप प्राथमिक बाब आहे, परंतु सोन्याच्या खाणीची शक्यता शोधण्यासाठी नव्याने सर्वेक्षण केले जात आहे. मात्र संबंधित विभाग यावर बोलण्यास तयार नाही.

एका वृत्तसंस्थेनुसार, झोरा आदिवासी समाज जशपुरनगरमधील ईब व तिची उपनदी सोनाजोरील सोन्याचे कण काढण्याचे काम करत आहे. इथल्या नद्यांमधून सोन्याचे कणही बाहेर पडतात.

नद्यांमधून सोने बाहेर आल्यामुळे केंद्र सरकारचे लक्ष याकडे वेधले गेले आणि २०१० मध्ये केंद्राने त्याकडे गांभीर्याने पाहिले. खनिज मंत्रालयाने दोन खासगी कंपन्यांमार्फत सोन्याच्या संभाव्यतेच्या दृष्टीने सर्वेक्षण केले, पण त्यावेळी फारसे काही कळले नाही.

हे सर्वेक्षण सुमारे ६ महिने चालल्यानंतर सोन्याच्या साठ्याबाबत पुष्टी झाली, पण सोन्याचे प्रमाण किती आहे आणि साठ्याचे स्थान कुठे आहे ते कळू शकले नाही. सर्वेक्षणाचे उत्खनन उद्योगाच्या विरोधामुळे थांबवलेही गेले होते. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील सोन्याच्या साठ्याच्या स्त्रोताबद्दल ठोस माहिती मिळवण्यासाठी हे सर्वेक्षण करण्याची तयारी आहे.

झोरा आदिवासी समाज जशपुरनगरमधील ईब व तिची उपनदी सोनाजोरीतील सोन्याचे कण काढण्याचे काम करत आहे. जिल्ह्यातील कांसाबेल व फरसाबहार परिसरातील नदीतून सोने काढण्याचे काम पावसाळा सुरू होताच सुरू होते. येथील लोक नदीची वाळू फिल्टर करुन सोने काढतात.

स्थानिक रहिवासी सोन्याचे कण काढण्यासाठी लाकडापासून बनवलेल्या एका वेगळ्याच साधनाचा वापर करतात. या लाकडी पात्राला दोबायन म्हणतात. या अजब आयताकार यंत्राचा मध्य भाग कटोरानुमा असतो. यात नदीचे पाणी आणि माती फिल्टर केली जाते. यामुळे सोन्याचे कण या पात्रात मध्यभागी तयार केलेल्या छिद्रात जमा होतात.

नद्यांच्या पाण्यातून व मातीमधून सोन्याचे कण काढणारे लोक आंतरराज्यीय तस्कर आणि स्थानिक दलालांच्या जाळ्यात अडकले आहेत. येथील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, तीन दिवसांच्या मेहनतीनंतर ते धान्याच्या दाण्याएवढे सोने गोळा करू शकतात. हे सोने स्थानिक दलाल ४०० ते ५०० रुपयांना खरेदी करतात, तर बाजारभाव एक हजार रुपयांपर्यंत आहे.