आश्चर्य ! चेन्नईत ‘सोनं’ पाण्याहून ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व देशात पाण्याचे दुर्भिक्ष असताना पावसाने देखील ओढ दिली आहे. मात्र तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला असून राजधानी चेन्नईत पाण्याचा भाव हा सोन्यापेक्षा जास्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संबंधी सीपीएम खासदारांनी संसदेत दावा केला आहे. त्यामुळे चेन्नई पूर्णपणे कोरडी पडली असून सगळीकडे पाण्यासाठी हाल सुरु आहेत.

आयटी हब असलेल्या या शहरातील सर्व मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगितले आहे. मात्र या सगळ्यात प्रशासन फक्त आरोप आणि प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे.
या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी असणारे राज्य सरकार मात्र विरोधकांवर आरोप करण्यात व्यस्त असून विरोधक देखील राज्य सरकारला दोष देत आहेत.

केंद्रीय जल आयोगाच्या माहितीनुसार चेन्नईमध्ये ४१ टक्के गरजेपेक्षा पाणी कमी आहे. त्यामुळे जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांना पाणीच मिळत नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. चेन्नई शहरातील अनेक मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट देखील बंद ठेवण्यात आली आहेत. या पाणीटंचाई विषयी बोलताना सीपीएम खासदार टी.के. रंगराजन यांनी राज्य सरकारवर टीका करताना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्वांनी मदत करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रश्नावर राज्यसभेत बोलताना ते म्हणाले कि, चेन्नई शहरातील एका पाण्याच्या टॅंकरचा भाव हा सध्या सोन्याच्या एक ग्रॅम किमतीपेक्षा देखील जास्त आहे. त्यामुळे चेन्नईत सोनं पाण्याहून स्वस्त झाल्याची टीका देखील त्यांनी केली. त्याचबरोबर या पाणीसंकटात इतर राज्यांनी मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त – 

काळजी घ्या ! फास्टफूड ठरू शकते तुमच्या शरीरासाठी अपायकारक 

ताणतणावामुळे वाढत चालले आहे नैराश्याचे प्रमाण 

लहान मुलांचा कान फुटला तर करा ‘हा’ उपाय 

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या