नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मधून तुम्हाला हव्या ‘त्या’ राज्यात काम करण्याची संधी, 5237 पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणा-यांसाठी बॅंकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियात सरकारी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. बॅंकेत ज्युनियर असोसिएटच्या एकूण 5 हजार 237 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज भरण्याचा आजचा 17 मे शेवटचा दिवस आहे. इच्छुक अन् पात्र उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.

पात्रता

एसबीआय लिपीक पदासाठी उमेदवार हा पदवीधर असावा. तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे उमेदवार देखील यासाठी अर्ज करु शकतात. तसेच उमेदवारांचे वय 20 वर्षे ते 28 वर्षे असावे. तसेच, उमेदवारांचा जन्म 2 एप्रिल 1993 पूर्वी आणि 1 एप्रिल 2001 नंतर झालेला नसावा. यात उमेदवारांना केवळ एका राज्यासाठीच अर्ज करता येणार आहे. म्हणून अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे याची खात्री करुन घ्यावी. तसेच त्या राज्यातील स्थानिक भाषा माहित असणे आवश्यक आहे.

अर्जासाठी शुल्क

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागतील. तर अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारले जाणार नाही.

SBI भरतीसाठी महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी प्रारंभ तारीख : 27 एप्रिल 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 मे 2021

पूर्व परीक्षेचे ट्रेनिंग कॉल लेटर : 26 मे 2021

पूर्व परीक्षेची तारीख : जून 2021

मुख्य परीक्षा : 31 जुलै 2021