पोलीस संशोधन केंद्रात ‘इंटर्नशीप’ करण्याची इच्छा असणार्‍या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या पात्रता अन् निवड प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   ज्यांना पोलीस दलासाठी काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. असे लोक आता पोलीस संशोधन केंद्र पुणे या संस्थेत इंटर्नशिप करू शकणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलासाठी संशोधन व प्रशिक्षण करणारी ही राज्य पातळीवरील संस्था आहे. या संस्थेत 3 ते 6 महिने किंवा ठराविक काळासाठी इंटर्नशिप दिली जाते. याची पात्रता काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे तसेच यात कोणते विषय आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

काय आहे इंटर्नशिपसाठीची पात्रता ?

1) मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये पदवी शिक्षण घेत असलेले अथवा पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकणार आहेत.

2) कोणतीही पात्र व्यक्ती, प्रोफेशनल व्यक्ती ज्यांना पोलीस दलासाठी काम करण्याची इच्छा आहे व त्या विषयातील ज्ञान आणि कौशल्य आहे अशा व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात.

3) पोलीस दलातील संबंधित पुढील विषयात करता येईल इंटर्नशिप –

– गुन्हेगारी शास्त्र
– सायबर गुन्हे
– महिला सुरक्षा
– बालका संदर्भातील गुन्हे
– वाहतूक
– पोलीस प्रशासन
– आर्थिक गुन्हे
– आर्टीफिशियल इंटेलिजन्स
– पोलीस प्रशिक्षण
– नागरिक सुरक्षा व सेवा

काय आहे यासाठीची निवड प्रक्रिया ?

1) इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोबाटा, कॉलेजच्या शिफारशी सह [email protected] या ईमेल आयडीवर पाठवावा.

2) पात्र उमेदवारांना निवड झाल्यांनंतर पुढील प्रक्रिया व वेळापत्रक कळवले जाईल.

3) निवड झालेल्या उमेदवारांना कॉलेजच्या विभाग प्रमुख मार्फत इंटर्नशिपचा कालावधी व कामकाज कळवले जाईल.

इंटर्नशिपच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे –

1) ही इंटर्नशिप 3 महिने किंवा 6 महिने किंवा ठरवून दिलेल्या कालावधीत पूर्ण करणं बंधनकारक असेल.

2) इंटर्नशिप दरम्यान फक्त अपवादात्मक परिस्थितीतच अधिकाऱ्यांच्या मंजुरीनं इंटर्नशिप सोडता येईल. अन्यथा इंटर्शिप पूर्ण करणं बंधनकारक असेल.

3) निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस संशोधन केंद्राकडून कोणत्याही प्रकारची छात्रवृत्ती STIPEND किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही.

4) प्रत्येक निवडेल्या उमेदवारास ठरवून दिलेल्या काळात ठरवून दिलेल्या कार्यलयातील अधिकाऱ्यांसोबत नियमित काम करणे बंधनकारक असेल.

5) महाराष्ट्र शासनाचे कार्यालयासाठींचे गोपनीय संदर्भातील सर्व नियम व कायदे यांचं पालन उमेदवारांना कसोशीनं करावं लागेल.

6) त्यांना मिळालेला किंवा शेअर केलेला डेटा इतरत्र वापरता येणार नाही किंवा कुठे शेअर करता येणार नाही. ज्या कामासाठी विशिष्ट डेटा घेतला आहे तो त्याच कामासाठी वापरता येईल.

7) कोणतीही कार्यालयीन माहिती किंवा विषय यांचा गैरवापर करणं, फेराफेर करणं, ताब्यात घेणं असे कोणतेही गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही.

8) इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर उमेदवारानं रिपोर्ट आपल्या कॉलेजच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या मार्फत सादर करणं आवश्यक आहे. ज्या अधिकाऱ्यांसोबत इंटर्नशिप पूर्ण केली आहे त्यांचा रिमार्क आवश्यक आहे.

9) इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर व रिपोर्ट सादर केल्यानंतर यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र दिलं जाईल.

10) इच्छुक उमेदवारांनी त्यांचा सीव्ही [email protected] या ईमेल आयडीवर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पाठवावा.

संपर्क अधिकारी – डॉ. संजय तुंगार, पोलीस निरीक्षक (9923701967) फोन – 020-25653693