खुशखबर ! 10 वी आणि 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 81,000 पर्यंत पगार; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 10 वी आणि 12 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेजने विविध जागांवर भरतीचे आयोजन केले आहे. त्यानुसार स्टेनोग्राफर, LDC, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, कारपेंटर आणि MTS आदी पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल. ग्रुप सी पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, स्किल / फिजिकल टेस्ट आधारे केली जाणार आहे. परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता अन् परिक्षेचे स्वरुप (Academic Qualifications and Examinations)
स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. स्कील टेस्ट नॉर्मनुसार 10 मिनिटांत 80 शब्द टायपिंग पाहिले जाणार आहे. तसेच 50 मिनिटांत इंग्रजी, 65 मिनिटांत हिंदी असे संगणकावर भाषांतर करता येणे गरजेचे आहे. लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 12 वी पास होणे गरजेचे आहे. तसेच स्कील टेस्टमध्ये इंग्रजी 35 wpm किंवा हिंदीमध्ये 30 wpm टायपिंग स्पीड असणे गरजेचे आहे. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदासाठी 12 वी उत्तीर्ण, आणि अवजड वाहनांचे लायसन गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेमध्ये 2 वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभवही गरजेचा आहे. मल्टी टास्किंग स्टाफ- यासाठी दहावी पास होणे गरजेचे आहे.

भरण्यात येणारी पदसंख्या (Positions to be filled)
स्टेनोग्राफर- 4 पद
लोअर डिव्हिजन क्लार्क- 10 पद
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर- 7 पद
मल्टी टास्किंग स्टाफ- 60 पद
अन्य – 2 पद

वेतन (Salary)
स्टेनोग्राफर : 25500 ते 81100 रुपये
लोअर डिव्हिजन क्लार्क : 19900 रुपये ते 63200 रुपये
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर : 19900 रुपये ते 63200 रुपये
सुखानी :- 9900 रुपये ते 63200 रुपये
कारपेंटर : 19900 रुपये ते 63200 रुपये
मल्टी टास्किंग स्टाफ ः18000 रुपये ते 56900 रुपये