Government Job : पदवी, ITI धारकांना केंद्राच्या टांकसाळीत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्र सरकारची मिनी रत्न कंपनी म्हणजेच टांकसाळीमध्ये पदवीधर आणि आयटीआयधारकांना नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. कोलकाता येथील टांकसाळीमध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात इंडियन गव्हर्नमेंट मिंटद्वारे 17 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनिअर टेक्निशिअन आणि अन्यसाठी एकूण 54 पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आयजीएम-एमपीएमसीआयएलच्या ऑफिशिअर वेबसाईटवर जाऊन igmkolkata.spmcil.com अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया बुधवार (दि.20) पासून सुरु होणार आहे. तर शेवटची मुदत ही 19 फेब्रुवारी असणार आहे.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी आयजीएम-एसपीएमसीआयएलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे. यानंतर तेथील करिअर सेक्शनच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर संबंधित भरतीच्या सेक्शनमध्ये 20 जानेवारी 2021 पासून उपलब्ध होणाऱ्या ऑनलाइन फॉर्मच्या लिंकवर क्लिक करावे. ही लिंक बुधवार (दि.20) पासून अ‍ॅक्टिव्ह होणार आहे. अर्जामध्ये आवश्यक असलेली माहिती भरावी लागणार आहे. अर्जासाठी 600 रुपये शुक्ल आकारले जाणार आहे, जे ऑनलाईन भरता येणार आहे.

रिक्त पदे आणि वेतन

1. सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशंस) – 10 जागा – 26 ते 1 लाख रुपये वेतन

2. इंग्रेवर 3 ते 6 पदे – 8500 ते 20850 रुपये वेतन

3. ज्युनियर ऑफिस असिस्टंट – 12 जागा – 8350 ते 20470 रुपये वेतन

4. ज्युनियर बूलियन असिस्टंट – 10 जागा – 8350 ते 20470 रुपये पगार

5. ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रॉनीक्स) – 16 जागा – 7750 ते 19040 रुपये वेतन

शिक्षणाची अट आणि वयाची अट

– सुपरवायझरसाठी मॅकेनिकल, सिव्हील, मेलर्जीकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा. वय 18 ते 30 वर्षे

– इंग्रेवर 3 साठी फाईन आर्टमध्ये पदवी – वय 18 ते 28 वर्षे

– ज्युनियर ऑफिस असिस्टंट व ज्युनियर बुलियन असिस्टंटसाठी कोणत्याही विषयातील पदवी. इंग्रजी किंवा हिंदीमध्ये 40 शब्द प्रती मिनिट टायपिंग. वय 18 ते 28 वर्षे

– ज्युनियर टेक्निशियनसाठी इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट, सोबत एनएसी सर्टिफिकेट. वय 18 ते 25 वर्षे

अर्ज आणि जाहिरातीच्या आवश्यक लिंक खाली देण्यात आल्या आहेत…

भरतीची जाहिरात –

https://igmkolkata.spmcil.com/UploadDocument/Advt%20for%20Recruitment%20to%2054%20Posts%20in%20Diff.%20Categories%20at%20India%20Govt%20Mint,%20Kolkata(A%20Unit%20of%20SPMCIL).071db2f6-9046-4eeb-b476-169d0bdd2ded.pdf

ऑनलाइन अर्जाची लिंक

https://igmkolkata.spmcil.com/Interface/JobOpenings.aspx?menue=5