सुवर्णसंधी ! रेल्वेमध्ये 35 हजार जागांसाठी मेगा भरती, असा करा अर्ज अन् मिळवा नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनामुळे अनेक लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोना काळात बेरोजगारांसाठी सरकारच्या अनेक विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या आणि बेरोजगार झालेल्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आरआरबी एनटीपीसी 2020 भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास 35 हजार 208 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी 35 हजार 208 जगांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. यामधील 24 हजार 605 जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित 10 हजार 603 जगा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहे. आरआरबी एनटीपीसी 2020 परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने Exam Counductiong Agency (ECA) ची नियुक्ती केली आहे. मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही मिळणार आहेत. हे भत्ते ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणी नुसार देण्यात येईल. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे (HRA), परिवहन भत्ता (Transport), पेन्शन योजना, वैद्यकीय फायदे, इतर विशेष भत्तादेखील लागू असणार आहे.

या पदासाठी होणार भरती

आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंट्स क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अॅप्रेंटिस या पदांसह स्टेशन मास्तर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.

कसा करायचा अर्ज

या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे या दरम्यान असावे. ओबीसीसाठी ते 18 ते 36 वर्षे आहे आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी ते 18 ते 38 वर्षे आहे.