रणवीर सिंहच्या ‘या’ ५ चित्रपटाने बॉक्स ऑफिस ‘मालामाल’, ‘खिलजी’ बनून तोडले सारे ‘रेकॉर्ड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बॉलिवूड मध्ये खूप कलाकार आहेत ज्यांनी कमी वेळेत नाव केले आहे. या यादीत रणवीर सिंहचाही नाव आहे. रणवीर ने बॉलिवूड मध्ये ‘बैंड बाजा बारात’ या चित्रपटातून २०१० मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रणवीरला फिल्म इंडस्ट्री मध्ये ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. एवढ्या कमी वेळेत रणवीरने आपल्या अभिनयाने लोकांवर ठसाही उमटवला आहे. आज रणवीरच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात असे ५ चित्रपट जे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.

गोलियों की रासलीला राम-लीला
२०१३ मध्ये रणवीरचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १५. ८५ कोटी कमाई केली होती. या चित्रपटाने एकूण २२० कोटी गल्ला केला होता. चित्रपटाचा बजेट ८८ कोटी होता. या चित्रपटात रणवीर सोबत दीपिका पदुकोणनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातूनच या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती.

बाजीराव मस्तानी
२०१५ मध्ये रणवीर सिंहची आणखीन एक चित्रपट ‘बाजीराव मस्तानी’ ने विजयाचा एक नवा झेंडा रोवला होता. या चित्रपटातही रणवीर सोबत दीपिका दिसली होती. ज्यांची केमेस्ट्री लोकांना खूपच आवडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळींनी केले होते. या चित्रपटाने धमाकेदार एन्ट्रीने पहिल्याच दिवशी १२. ८० कोटी कमाई केली होती. या चित्रपटाने एकूण ३६५ कोटी कमाई केली होती, तर चित्रपटाचा बजेट १४५ कोटी होता.

पद्मावत
या चित्रपटाने रणवीर सिंहचा करियरच बदला होता. या चित्रपटाने दाखवून दिले की हिंदी चित्रपट जगात रणवीर सिंहला बरोबरी देणे अवघडच नाही तर अशक्य आहे. या चित्रपटात रणवीर सिंह सोबत दीपिका होती. या चित्रपटात रणवीरने ‘खिलजी’ची भूमिका साकारली होती. ज्यासाठी रणवीरने खूपच कष्ट केले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शना आधी खूप विरोध झाला होता. पण चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी १८ कोटी कमाई केली होती. तर ऐकून कमाई ५८५ कोटी केली होती. चित्रपटाचा बजेट २१५ कोटी होता.

सिंबा
‘पद्मावत’ चित्रपटानंतर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रणवीरचा हा चित्रपट दीपिका सोबत लग्नानंतर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणवीर सोबत सारा अली खाननी अभिनय केले होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०. ५० कोटी कमाई केली होती. तर एकूण ४०० कोटींचा गल्ला या चित्रपटाने केला होता. या चित्रपटाचा बजेट ८० कोटी होता.

गली बॉय
रणवीर सिंहचा बॉक्स ऑफिसवर शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला तो म्हणजे ‘गली बॉय’. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. चित्रपटात रणवीर सोबत आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १८. ५ कोटी कमाई केली. तर २३६. १६ कोटी एवढी एकूण कमाई केली होती.

आरोग्यविषयक वृत्त

‘दुध’ आरोग्यासाठी चांगलेच, पण असे पिऊ नका ; होईल नुकसान

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाच्या पाण्यामुळे जपता येते ‘केसांचे’ आरोग्य

सिने जगत

Video : विद्युत जामवाल आणि टायगर श्रॉफनंतर ‘या’ अभिनेत्रीने पूर्ण केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’

मीका सिंहच्या गाण्यावर थिरकणार राय लक्ष्मी

बाथरुममध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत ‘इंटिमेट’ झाला विक्की कौशल

बहुजननामा

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ