Golmaal Again In Cinemas : अजय देवगनच्या ‘गोलमाल अगेन’ सोबतच ‘या’ देशामध्ये पुन्हा उघडणार सिनेमा हॉल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस महामारीच्या काळात जगभरातील अनेक देशातील सिनेमा हॉल बंद करण्यात आले होते. ज्या देशात करोनोचा प्रसार कमी होत आहे किंवा संपला आहे तिथलं जनजीवन पुन्हा पूर्वीसारखं होत आहे. न्यूझिलंड हा देशही असाच आहे जिथं सिनेमा हॉल सुरू होणार आहेत. खास बात अशीय की, न्युझिलंडमधील सिनेमा हॉलची ओपनिंग ही अजय देवगण याच्या गोलमाल अगेन सिनेमानं होणार आहे.

रिलायन्स एंटरटेंमेंटनं ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहलंय की, “कीवीज थिएटर्समध्ये वापस येत आहे गोलमाल अगेन. हा सिनेमा कॉविड 19 नंतर दाखवला जाणार पहिला सिनेमा बनला आहे. या नव्या सुरुवातीसाठी चिअर्स.”

रोहित शेट्टी यानंही त्याच्या इंस्टावरून यासंदर्भात माहिती दिलीय. रोहितनं लिहिलं की, “न्युझिलंडनं गोलमाल अगेन सिनेमा हॉलमध्ये पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉविड 19 महामारीनंतर रिलीज होणार हा पहिला सिनेमा बनला आहे. न्युझिलंड आता कोरोनामुक्त झालं असून 25 जून पासून गोलमाल अगेनसोबत सिनेमा हॉल सुरू होत आहेत. जसं की कोणी तरी म्हटलं, द शो मस्ट गो ऑन.”

रोहित शेट्टी डायरेक्टेड हा सिनेमा 2017 साली दिवाळीला रिलीज झाला होता. हा या सीरिजमधील चौथा सिनेमा होता. आणि 200 कोटींच्या कल्बमध्ये समाविष्ट होणार अजय देवगणच्या करिअरमधील पहिला सिनेमा होता.