वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो ‘गोलो डाएट’ ! जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करून थकला असाल तर आज आपण यासाठी एक खास आणि सोपा डाएट जाणून घेणार आहोत. या डाएटचं नाव आहे गोलो डाएट. आज आपण याचे फायदे आणि तो कसा करायचा याबद्दल इतर माहिती घेणार आहोत.

गोलो डाएटचे फायदे-

– इंसुलिन आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं.
– भूक, वजन नियंत्रणात राहते
– पचनक्रिया चांगली राहते
– साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं

काय आहे गोलो डाएट ?

गोलो डाएट म्हणजे मांस, भाज्या फळं यांचा समावेश असणारा प्रोटीन, कार्ब्स आणि गुड फॅट्स असलेला आहार आहे. यात फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, साखर अशा पदार्थांपासून तुम्ही दूर राहता. आहारात, अंडी, भाज्या, फळं यांचा समावेश असावा. मधल्या काळात भूक लागली तर तळलेल्या पदार्थांऐवजी ड्रायफ्रूट्स खा.

गोलो डाएट प्लॅन

नाष्ता – अंड, ब्रोकोली, बदाम, ओट्स, फळं, कडधान्याच्या उसळी

दुपारचं जेवण – भाकरी, कमी तेलाच्या भाज्या, काकडी, गाजर आणि टोमॅटो सॅलड.

रात्रीचं जेवण – रात्रीचा आहार कमी असावा. यात सॅलड, एक चपाती, भाजी असावी.