गोव्यात गोमंतक पक्षाचा मुख्यमंत्रीपदावर दावा

पणजी : वृत्तसंस्था

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट बातम्या सध्या प्रसिद्ध होत आहेत. यामुळे गोव्यातील राजकीय हालचालीही वेगाने होऊ लागल्या आहेत. गोव्यातील विद्यमान सरकार अस्थिर असल्याचे सांगत काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला होता. आता संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानेही उडी घेतली आहे. पक्षातर्फे मुख्यमंत्रीपदासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपपुढे ठेवण्यात आला आहे. पर्रिकर यांची प्रकृती बिघडलेली असताना सत्तेसाठी राजकारण्यांच्या सुरू असलेल्या धडपडीने गोवेकरही आश्चर्य चकित झाले आहेत. असंवेदनशील राजकारण सध्या गोव्यात दिसून येत आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2393add3-baf3-11e8-b720-7d0303507737′]

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत गोव्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर आपले मत मांडले. मनोहर पर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री असून त्यांनी अजून पद सोडलेले नाही. त्यामुळे पर्यायी नेतृत्वाविषयीच्या अफवांना अर्थ नाही, असे ते म्हणाले. असे असले तरी मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आलीच तर गोव्याचा मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा असेल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार भाजपच्या वाटेला निघाले असल्याचा अफवांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दीपक ढवळीकर म्हणाले, आमच्या पक्षाचे आमदार एकसंघ असून आमदार फुटल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. भाजपाने अफवा पसरवण्याचा प्रयत्न करु नये. आमचा पक्ष राज्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असून भाजपात विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रसिद्धी विनायक : राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून मोदींवर पुन्हा फटकारे

पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री आजगावकर म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकते, विधानसभा बरखास्त होऊन निवडणुका झाल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत. आजगावकर यांच्या या वक्तव्याने संभ्रम आणखी वाढला आहे. काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर आता गोमंतक पक्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या मागणीने गोव्यातील राजकीय नाट्य वेगळ्याचा वळाणावर जाण्याची शक्यता आहे.