गोमती चक्र ठेवण्याचे ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आर्थिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी अनेजण विविध उपाय करत असतात. अशा प्रकारच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी गोमती चक्र खुप लाभदायक ठरते. याबाबत शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. गोमती चक्राचे हे उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळू शकतो. तसेच इतर समस्यांमधून देखील दिलासा मिळू शकतो.

हे उपाय करा
1.
व्यवसायाचा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी 11 अभिमंत्रित गोमती चक्र आणि तीन लहान नारळ पूजा करून पिवळ्या कपड्यात गुंडाळून प्रमुख दारावर लटकून ठेवा.

2. सतत आर्थिक हानी होत असल्यास महिन्याच्या पहिल्या सोमवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्रांना हळदीने तिलक करा. महादेवाचे ध्यान करून पिवळ्या कपड्यात गुंडाळून घरात फिरवा. नंतर वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.

3. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्र पिवळ्या कपड्यात ठेवून देवी लक्ष्मीचे स्मरण करत विधिपूर्वक पूजन करा. दुसर्‍या दिवशी त्यातून 4 गोमती चक्र काढून घरातील चारी कोपर्‍यात एक-एक ठेवा. 3 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. 3 चक्र पूजेच्या ठिकाणी ठेवा. एक चक्र एखाद्या मंदिरात समस्या बोलून देवाला अर्पण करा.

4. वारंवार नजर लागत असल्यास निर्जन ठिकाणी जाऊन 3 गोमती चक्र स्वत:वरून 7 वेळा ओवाळून मागील बाजूला टाका. नंतर मागे वळून न पाहता परत या.

5. मुले खूप घाबरट असल्यास महिन्यातील पहिल्या मंगळवारी अभिमंत्रित गोमती चक्रावर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुर लावून ती लाल कपड्यात बांधून मुलांच्या गळ्यात घाला.