‘हा’ एक रत्न बदलेल तुमचं नशीब अन् आयुष्य, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल प्रत्येक जण आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये यासाठी प्रयत्न करत असतो आणि अनेक उपाय देखील करतो. यासाठीच पर्याय म्हणून प्रत्येक व्यक्ती ज्योतिष शास्त्राचा आधार घेतो आणि एखादे रत्न घालण्याचा प्रयत्न करतात. रत्नामुळे व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होतो असे देखील सांगितले जाते. ग्रहांच्या अनुकूलतेनुसार रत्न धारण केले तरच त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. आज त्यातीलच एक गोमेद रत्नाबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

वकिली, न्याय आणि रॉयल्टी संबंधित कामात गोमेद रत्न परिधान केले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीची रास मिथुन, तूळ, कुंभ किंवा वृषभ असेल तर अशा लोकांना गोमेद घालायलाच पाहिजे. जर राहु कुंडलीत केंद्रस्थानी असेल म्हणजेच 1, 4, 7, 10 व्या घरात असेल तर गोमेद रत्न नक्कीच धारण केले पाहिजे. जरी राहू दुसर्‍या, तिसर्‍या, नवव्या किंवा अकराव्या घरात ठेवला असेल तर गोमेद धारण करणे खूप फायदेशीर ठरेल.

राहू जर आपल्या राशीमध्ये सहाव्या आणि आठव्या घरात असेल तर गोमेद परिधान करणे हितकारक ठरेल. राहू जर आपल्या खालील धनु राशींसोबत असेल तरी देखील गोमेद रत्न घालायला हरकत नाही. राहू मकर राशीचा मालक आहे. म्हणून, गोमेद धारण केल्याने मकर राशीच्या लोकांना फायदा वाढतो. जर राहु शुभ भावनेचा मालक असेल आणि त्याने सूर्याशी युती केलेली असेल किंवा शत्रुत्व असेल अथवा सिंह राशीत स्थित असेल तर गोमेद धारण करावा. राहू हे राजकारणाचा विषाणू आहे, म्हणून जे राजकारणात सक्रिय आहेत किंवा सक्रिय होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे फार महत्वाचे आहे. जर राहू शुक्राशी आणि बुध सोबत जुळला असेल तर गोमेद नक्कीच घातले पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like