आरोग्‍य केंद्रात डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने महिलेची प्रसूती फरशीवरच 

गोंदा (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – उपचारासाठी वेळेत डॉक्‍टर उपलब्ध न झाल्‍याने एका महिलेची प्रसूती फरशीवरच करण्यात आली. हा प्रकार खूपच गंभीर आणि चिंताजनक आहे. उत्तर प्रदेशमधील गोंदा जिल्ह्यात हा सगळा प्रकार आहे. एका महिलेला चक्क फरशीवर बाळास जन्‍म देण्‍याची वेळ आली आहे. गोंदा जिल्ह्यातील आरोग्‍य केंद्रात हा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ हे सगळं घडत होतं.
ही महिला बाळाला जन्म द्यायच्या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या इतर गर्भवती महिलांनी तिच्याभोवती रिंगण केले आणि त्या महिलेने आरोग्‍य केंद्राजवळील कचर्‍याच्‍या ढिगार्‍याजवळ फरशीवरच बाळाला जन्‍म दिला.
हा सर्व प्रकार घडल्यानंतर आरोग्‍य विभागाचे अतिरिक्‍त संचालक डॉ. रतन कुमार म्‍हणाले, “की या महिलेच्‍या बाबतीत घडलेला हा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची तपासणी केली जाईल व या घटनेस जबाबदार असलेल्‍या दोषी व्‍यक्‍तीवर योग्‍य ती  कारवाई करण्‍यत येईल.”
अनेकदा गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होते. यामुळेही महिलांचा मृत्यू होतो. दरम्यान जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) दिलेल्‍या माहितीनुसार गरदोरपणात गुंतागुंत निर्माण झाल्या कारणाने व बाळंतपणात म्‍हणजे प्रसुतीवेळी एका तासाला पाच महिलांचा मृत्‍यू  होतो. भारतात प्रत्‍येक वर्षी ४५ महिलांचा मृत्‍यू  बाळंतपण व त्‍याशी निगडीत कारणामुळे होतो. मिळालेल्‍या माहितीनुसार,  भारतात १ हजार ६६८ लोकसंख्येमागे केवळ एक डॉक्‍टर असे प्रमाण आहे.