योगी आदित्यनाथांच्या मंत्र्याचे बलात्काराबाबत ‘वादग्रस्त’ वक्‍तव्य

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवरून लहान मुलींच्या बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळवण्याऐवजी राज्य सरकारचे मंत्री वादग्रस्त विधाने करण्यात व्यस्त आहेत. उत्तरप्रदेशचे एक मंत्री तर बलात्काराचे स्वरूपच सांगत आहेत.

योगी सरकारमधील मंत्री उपेंद्र तिवारी मीडियाशी बोलताना म्हणाले की, बलात्काराचे स्वरूप असतं. अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार झाला तर त्याला आपण बलात्कारच म्हणणार परंतु काहींमध्ये ३०-३५ वर्षांच्या विवाहित महिलेवर झालेल्या बलात्काराचे स्वरूप वेगळे आहे.

उपेंद्र तिवारी येथेच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, काही जण पाच-सहा वर्षं एकत्र राहतात आणि त्यानंतर बलात्काराची तक्रार करतात.अशाप्रकारे बलात्काराच्या बऱ्याच विसंगती आणि स्वरूप आढळून येतात.

उपेंद्र तिवारी ने म्हंटले की, ज्या ठिकाणी अशाप्रकारच्या घटना घडत आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः लक्ष्य घालत आहेत. त्या ठिकाणी कडक कारवाई करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. योगी सरकारचे मंत्री गोंडा येथे भाजपच्या संघटन बैठकीत उपस्थित होते. याच वेळी मीडियाशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

आरोग्य विषयक वृत्त –

मधात भिजलेले बदाम खा आणि रहा ‘निरोगी’

अंडी उकडताना करू नका ‘या’ चूका, योग्य पध्दत जाणून घ्या

डायबिटीज नियंत्रितणात ठेवायचाय ? करा ‘हे’ रामबाण उपाय

फक्त ७ दिवसांमध्ये वजन कमी करण्याचे प्रभावी ‘हे’ ११ उपाय