×
Homeअ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)Gondia ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना उपविभागीय अधिकारी, शाखा...

Gondia ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – Gondia ACB Trap | जिल्हा परिषद गोंदिया येथील जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ कनेक्शन जोडणीच्या कामाच्या बीलावर सही करुन मंजुरीकरीता विभागीय कार्यालयात पाठवण्यासाठी 15 हजार रुपये लाच घेताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा उपविभागीय अधिकारी आणि शाखा अभियंता यांना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Gondia ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई ग्रामीण पाणीपुरवठा उप विभाग जिल्हा परिषद गोंदिया येथे बुधवारी (दि.23) करण्यात आली.

 

उपविभागीय अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ,उपविभाग, जिल्हा परिषद गोंदिया नृपालसिह अजाबसिह जतपेले (वय 55 रा. प्लॉट नं 4, मसेब कॉलनी, गजानन महाराज मंदिर जवळ, ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी जिल्हा – चंद्रपूर), शाखा अभियंता दामोधर जगन्नाथ वाघमारे (वय 57 रा. नूतन शाळेसमोर ,मामा चौक, गोंदिया) असे लाच घाताना रंगेहात पकलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत लाखनी येथील 27 वर्षाच्या ठेकेदाराने गोंदिया एसीबीकडे (Gondia ACB Trap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांनी जिल्हा परिषद गोंदिया येथील जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळ कनेक्शन जोडणीचे ग्राम पिंडकेपार व कन्हारटोला येथील काम केले आहे. केलेल्या कामाचे M B बुक व देयकावर सही करून मंजुरीकरिता विभागीय कार्यालय जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविणेकरिता दामोदर वाघमारे याने 9000 रुपये व नृपालसिंह जतपेले याने 6,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी गोंदिया एसीबीकडे तक्रार केली.

गोंदिया एसीबी युनिटने मंगळवारी (दि.23) आणि बुधवारी (दि.23) पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी जतपेले याने लाचेची मागणी करून ही रक्कम वाघमारे याचे कडे देण्यास सांगितले. बुधवारी ग्रामीण पाणीपुरवठा उप विभाग जिल्हा परिषद गोंदिया येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 15 रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्या विरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई नागपूर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर,
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर,
पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस अंमलदार विजय खोब्रागडे संजय बोहरे,
मिल्कीराम पटले, संतोष शेंडे, राजेंद्र बिसेन, मंगेश काहालकर, संतोष बोपचे,
चालक दीपक बतबर्वे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Gondia ACB Trap | Sub-divisional officer, branch engineer caught in anti-corruption net while taking Rs 15 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे तेजस्वी यादव भेटीत कोणत्या विषयावर चर्चा?, आदित्य ठाकरे म्हणाले…

Jalna ACB Trap | जमीन नावावर करुन देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणारा तलाठी लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

MP Bhavana Gawali | अकोल्यातील गोंधळावर खासदार भावना गवळींनी केली तक्रार दाखल;
खा. विनायक राऊत आणि आ. नितीन देशमुख यांनी चिथावल्याचा आरोप

Must Read
Related News