Gondia Accident | कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू, गोंदिया मधील घटना

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – Gondia Accident | काम संपवून घरी परतत असताना कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात (Gondiya Accident) बुधवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात (Sadak Arjuni Tahasil) खोबा गावाजवळ झाला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेत रामकृष्ण बिसेन (24), सचिन कटरे (24), संदीप सोनवाने (18), निलेश तुरकर (27) यांचा मृत्यू झाला आहे तर, 24 वर्षीय तरूण प्रदीप बिसेन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (Gondia Accident)

 

मृतक गोंदिया जिल्ह्यातील (Gondiya District) आमगाव तालुक्यातील (Amgaon Tahasil) रहिवासी होते.
बुधवारी रात्री ते तालुक्यातील नवेगावबांध परिसरात सोलर पंप फिटिंगच्या (Solar Pump Fitting) कामाकरीता गेले होते.
काम संपल्यानंतर ते कारने परतत असताना कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या खाली कोसळली.
अपघात इतका मोठा होता की, कार पूर्णपणे चकनाचूर झाली. यात गंभीर जखमी झालेल्या चारजणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : –  Gondia Accident | four youths died on the spot in an accident gondiya accident crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा