गोंदिया-भंडाऱ्यात 49 ठिकाणी पुन्हा मतदान होणार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

आता गोंदिया-भंडाऱ्यात ४९ ठिकाणीउद्या (३०मे ) ला पुन्हा मतदान होणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाकडून दिला गेला आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे निवडणूक आयोगाणे हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळवण्यात येत आहे. उद्या म्हणजे ३० मे रोजी मतदान पार पडणार असून, नेमकी वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.

भंडारा-गोंदिया येथे काल झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही जिल्ह्यात सुमारे ४५० होऊन अधिक अधिक ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने एकच खळबळ उडाली होती.आयोगाच्या या भोंगळ कारभारामुळे मतदारांना मतदानासाठी ताटकळ रहावे लागले.नंतर ईव्हीएम मशीन्स बंद असल्याच्या कारणावरुन निवडणूक आयोगाने मतदानाची प्रक्रिया काही केंद्रांवर बंद करण्यात आली होती. पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात २८ मे रोजी मतदान पार पडले.

संबंधित घडामोडी:

गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली ?

भांडारा -गोंदियात सुमारे सव्वाशेहून अधिक ईव्हीएम मशीन्स बिघडली

कोण आहेत रिंगणातील उमेदवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र लढत असून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून हेमंत पटले मैदानात आहेत.

भाजपचे हेमंत पटले हे माजी आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे तीन वेळा आमदार राहिले आहेत. एकूण 18 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आघाडी केली असली, तरी ही जागा काँग्रेसला जाईल आणि नाना पटोले उभे राहतील, अशी धारणा होती. मात्र राष्ट्रवादीने जागा सोडली नाही आणि प्रफुल्ल पटेल स्वतःही उभे राहिले नाहीत. मात्र दोघांनी अत्यंत जुनं वैर मिटवलं. दोघांनीही राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांच्यासाठी प्रचार केला.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे येऊन गेले, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर जोर लावला आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा क्षेत्र असून त्यापैकी सहा भाजप, तर एक काँग्रेसकडे आहे.