Gondia Crime News | ‘टाईमपास नाही करत आपण सिरीयसली…’ असे म्हणत 16 वर्षीय मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – Gondia Crime News | “व्हॅलेंटाईन डे”च्या दिवशी औरंगाबाद येथील एकाच महाविद्यालयातील दोघांनी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी असताना आता गोंदियामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकतर्फी प्रेमातून एका 16 वर्षांच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (Gondia Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मोहाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 16 वर्षीय मुलाने एकतर्फी प्रेमातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्याअगोदर एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये “i love you….टाईमपास नाही करत आपण सिरीयसली प्रेम करतोय तुझ्यावर….” असे लिहले आहे. (Gondia Crime News)

 

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहाडी या ठिकाणी एकतर्फी प्रेमातून 16 वर्षांच्या मुलाने केलेल्या आत्महत्येच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

 

Web Title : – Gondia Crime News | 16 year boy killed himself over one side love in gondiya

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बलात्कारातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी दिलेले चेक झाले बाऊन्स; 65 वर्षीय माजी मंत्र्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका

Parbhani Crime News | आईला भेटायला जात असताना तरुणाचा अपघाती मृत्यू; परभणीमधील घटना