Gondia Crime News | गोंदिया हादरलं! सहलीमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – Gondia Crime News | गोंदिया जिल्ह्यातून शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी शिक्षकाने शैक्षणिक सहलीदरम्यान बसमध्ये विद्यार्थिनीची छेड काढली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील गोलीवार असे त्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी शिक्षक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. (Gondia Crime News)

काय घडले नेमके?

आमगाव तालुक्यातील एका शाळेची शैक्षणिक सहल ही स्लीपर कोच बसने पंचमढी या ठिकाणी गेली होती. दरम्यान, सहल पूर्ण करून परत येत असताना 4 जानेवारीला रात्री नऊ वाजता बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक झोपी गेल्यावर या शिक्षकाने 15 वर्षीय विद्यार्थिनीला बसच्या मागील सीटवर बोलाविले. विज्ञान विषयाचा अभ्यास करण्याच्या बाहाण्याने या शिक्षकाने तिला बोलावले यानंतर तिचा विनयभंग केला. (Gondia Crime News)

सहलीवरून परत आल्यानंतर या विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला. आपल्या मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पालकांनी तातडीने आमगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी शिक्षक सुनील गोलीवार याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाविरोधात भादंविच्या कलम 354(अ) भादंवि 8,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी शिक्षक फरार झाला आहे. आमगाव पोलिस या आरोपी शिक्षकाचा शोध घेत आहेत. (Teacher Molested Student)

Web Title :-Gondia Crime News | teacher molested student in amgaon case was filed against the accused teacher

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा देशमुखांच्या भाजप प्रवेशाला विरोध, म्हणाले – ‘… म्हणून लातूरच्या प्रिन्सची भाजपात येण्याची इच्छा’

Nitesh Rane | ‘तो फक्त सिरीयल पुरताच आहे…,’ म्हणत नितेश राणेंकडून अमोल कोल्हेंवर एकेरी शब्दात टीका