गोंदिया : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले दादा

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन

तिरोडा येथे प्रचारसभेला जाताना बिरसी फाटा नाला येथे कारचा अपघात झाला. त्याचवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री अनिल देशमुख हे भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीसाठी तुमसर इथल्या सभेला जात होते. अपघात झाल्याचे पाहून त्यांनी तात्काळ अपघात ग्रस्त लोकांना गाडीतून बाहेर काढले आणि त्यांना एका कार्यकर्त्याच्या वाहनातून तिरोडा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रवाना केले.