Gondia Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संगीत शिक्षकाला 11 वर्षांचा कारावास आणि 17 हजारांचा दंड

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – Gondia Minor Girl Rape Case | संगिताचे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संगीत शिक्षकाला (Music Teacher) मंगळवारी (दि.31) जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाचे (District and Special Sessions Court) न्यायाधीश ए.टी. वानखेडे (Judge A.T. Wankhede) यांनी 11 वर्षांचा सश्रम कारावास (Rigorous Imprisonment) आणि 17 हजार रुपये दंडाची शिक्षा (Penalty) सुनावली (Gondia Crime) आहे. दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नईम खान पठान (वय- 40 रा. संत रविदास वार्ड, तिरोडा) असे शिक्षा झालेल्या (Gondia Minor Girl Rape Case) आरोपीचे नाव आहे.

 

आरोपी तिरोडा येथे मुलांना संगित शिकवत होता. पीडित 14 वर्षांची मुलगी इतर मुलींसोबत आरोपीकडे 2017 ते 2020 या कालावधीत संगित शिकण्यासाठी जात होती. आरोपीने मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार (Gondia Minor Girl Rape Case) केले. तसेच याबाबत कोणाकडे वाच्चता करायची नाही असे सांगितले. आरोपीने सप्टेंबर 2020 मध्ये मुलीला पळवून नेत तिचे लैंगिक शोषन (Sexual Abuse) केले. याबाबत मुलीच्या आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांनी 9 सप्टेंबर 2020 रोजी तिरोडा पोलीस ठाण्यात (Tiroda Police Station) फिर्याद दिली.

 

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे (PSI Rahul Sable) यांनी करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र (Charge Sheet) सादर केले.
आरोपी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोप नईम खान पठान याला शिक्षा सुनावली.
न्यायालयात विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी (Special Public Prosecutor Krishna D. Pardhi)
यांनी काम पाहिले. या प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार,
पिडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकीलांनी 7 साक्षदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले.
न्यायालयाच्या कामकाजासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (SP Nikhil Pingle) व
अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर (Addl SP Ashok Bunkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायड (Police Inspector Dinesh Tayed)
यांच्या देखरेखीत पैरवी कर्मचारी सहायक पोलीस उपनिरीक्षक शंकर साठवने (ASI Shankar Sahithane)
यांनी काम पाहिले.

अशी सुनावण्यात आली शिक्षा
भारतीय दंड विधान (IPC) कलम 363 नुसार 3 वर्षाचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड,
दंड न भरल्यास 4 महिन्याचा अतिरिक्त कारावास,
भारतीय दंड विधान कलम 366 अंतर्गत 5 वर्षांचा सश्रम कारावास व 7 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिन्याचा अतिरिक्त कारावास,
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत 3 वर्षाचा सश्रम कारावास व 3 हजार रूपये दंड,
दंड न भरल्यास 4 महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी एकुण 11 वर्षाचा सश्रम कारावास व
एकुण 17 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

 

Web Title :- Gondia Minor Girl Rape Case | A music teacher who raped a minor girl was jailed for 11 years and fined 17 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anil Parab | ‘नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला बोलवा..;’ म्हणत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले म्हाडाच्या सीईओला फैलावर

Pune Crime News | भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला दगड, तीन जणांवर FIR; कोथरुडमधील घटना

Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांची भली मोठी यादी; काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढणार