राहत्या घरामध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – नक्षलग्रस्त भागातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवडी येथे घडली आहे. ओमप्रकाश रहिले असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ओमप्रकाश रहिले हे देवरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत अलेल्या सी 60 पथकामध्ये कार्यरत होते. ओमप्रकाश हे 2011 मध्ये पोलीस दलात भर्ती झाले होते. ते देवडी येथे एका भाड्याचे घर घेऊन रहात होते. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांकडून त्यांच्या आत्महत्येतेचे कारण शोधण्यात येत आहे.

गोंदिया नक्षलग्रस्त असलेल्या सी 60 पथकामध्ये ओमप्रकाश कार्यरत होते. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र पोलीस विभागात या पोलीस जवानाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.