गोंदवले ग्रामीण रुग्णालयाला माणदेशी भागातील रुग्णासाठी अद्यावत 12 लाखची रुग्णवाहिका देणार : डॉ नीलम गोऱ्हे

सातारा, पोलीसनामा ऑनलाइन-  गोंदवले खुर्द सातारा येथे शासनाचे ग्रामीण रुग्णालय ला HSBC बँक, सिपला कंपनी व माणदेशी फौंडेशन यांच्यावतीने कोविड सेन्टर सुरू करण्यात आले. त्याचे उदघाटन दुरदृश्य प्रणालीद्वारे विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी श्री शेखर सिंग, श्रीमती अलोक मुजुमदार- HSBC बँक, माणदेशी फाउंडेशन च्या अध्यक्ष चेतना सिन्हा उपस्थिती होत्या.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम डॉ गोऱ्हे यांनी आपल्या भाषणामध्ये या ग्रामीण रुग्णालयामध्ये अद्यावतीकरण सह आधुनिक कोविड सेन्टरचे लोकार्पण केल्याचे जाहीर केले. आपल्या भाषणांमध्ये त्यांनी सर्वांचे प्रयत्नाने कोविड सेन्टर सुरू झाले यांचा आनंद झाल्याचे सांगितले. या भागामध्ये गोंदवले हे नवीन आरोग्य केंद्र म्हणून प्रसिद्द होईल अशी आशा व्यक्त केली. माणदेश फौंडेशनच्या नावाने हा भाग जगभर प्रसिद्द झाला आहे. आणि आता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम सुरू केले आहे. सर्वाना प्रथमच महामारी चे भयानक रूप समजले.आपत्ती मध्ये सर्वात प्रथम महिला व बालकांना त्रास होतो.

या कालावधीत ही महिलांवरील व बालकांवरील अत्याचार खूप वाढले. हे प्रश्न कोविड कालावधीत सोडवताना खूप कष्ट पडले. गोंदवलेमध्ये निर्माण केलेले हे आरोग्याचे व पब्लिक प्रायव्हेटच्या सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे.ग्रामीण भागातील लोकांना यामधून होणारी मदत नक्कीच उल्लेखनीय आहे. मा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मा उद्धव ठाकरे यांचे सहकार्याने मी पुन्हा आमदार होऊन मी उपसभापती झाले. हे माझे भाग्य आहे.आता पर्यंत चेतना सिंन्हा यांनी शासनाकडे काही मागितले नाही. म्हणून मी या भागासाठी आवश्यक असणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी 12 लाख स्थानिक विकास निधीतून देत आहे याचा मला व्यक्तिशः आनंद आहे असे जाहीर केले. ह्या कालावधीत मनोरुग्णाची संख्या खूप वाढली आहे. या कालावधीत सर्वाना भावनिक सहकार्य आवश्यक आहे. ते पुरविण्याचे काम माणदेशी फौंडेशन व आरोग्य विभागाने करावे. ह्या भागातील आरोग्य विभागाने सर्व लोकांनी मास्क वापरणे व श्वसनाचे व्यायाम करणेबाबत खूप प्रचार करावा. .

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही शिकू शकलो. त्यामुळे आपल्यासमोर उभी आहे. हे माझे भाग्य आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये सर्व सातारा पत्रकार यांचेही सहकार्या मोलाचे आहे असे गौरव उद्गार काढले.

यादरम्यान श्रीमती चेतना सिन्हा यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये माणदेश भागात कोविड कालावधीत सर्व अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,परिचरिका व डॉक्टर यांनी केलेले काम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे असे सांगितले. HSBC बँक व सिपला कंपनीने या भागासाठी अत्यंत मोलाची मदत केली. हे ग्रामीण रुग्णालयाचे अद्यावती करनाचे काम कायम स्वरूपी राहनार आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांचे सूचनेनुसार ह्या रुग्णालयामध्ये अद्यावत कोविड सेन्टर सुरू केले.

श्रीमती अलोक मुजुमदार HSBC बँक यांनी आपल्या भाषणात हा बॅंकेसाठी अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे व कोविड 19 सेन्टर उभारणीमध्ये माणदेश फौंडेशन,सिपला कंपनी, महाराष्ट्र शासन यांच्या संयोगाने केलेले काम आमच्यासाठी नक्कीच मनाला आनंद देणारे आहे. या महामारीच्या कालावधीत सर्व आरोग्य कर्मचारी यांनी दिलेले योगदानाबद्दल आभार ही मानले व कौतुक केले.

जिल्हाधिकारी श्री शेखर सिंग यांनी चेतना सिन्हा यांचे कामाचे खूप कौतुक केले. संपूर्ण कोविड कालावधीमध्ये माणदेश फौंडेशन यांनी खूप लोकांना मदत केली. या संस्थेचे कौतुकामध्ये माणदेशी फौंडेशन काम खूप करतात व मात्र प्रसिद्धी कमी करतात असेही सांगितले. HSBC बँक व माणदेशी फौंडेशनने जिल्हा हॉस्पिटलमध्ये 53 बेडचे कोविड सेन्टर सुरू केले. यानंतर अत्यंत आवश्यक असे गोंदवले मध्ये या सर्वांच्या वतीने रुग्णालयाचे अद्यावतीकरन केले याचे कौतुक आहे. सर्व आरोग्य स्टाफने कोविड कालावधीत केलेल्या कामाचे कौतुक केले. सर्व आरोग्य विभागाने आताच ज्यास्त काम करावे लागेल. अद्याप कोविड संपलेला नाही.आत्ताच रुग्णात दिसत असलेल्या लक्षणे ओळखून त्यावरती काम करावे असे सूचित केले. नर्सिंगचे कामचे महत्व सांगताना ते म्हणाले की,रुग्ण चांगल्या नर्सिंगच्या सेवेमुळे नक्कीच बरे होतात. त्यामुळे आपण सर्व करत असलेले काम नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालया उभारल्या बद्दल पंचक्रोशीतील जनतेने शासनाचे व या सर्व संघटनांचे आभार मानले.