श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

पुणे  : प्रतिनिधि –   श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त ससुन रुग्णालयास विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले यात प्रामुख्याने पीपीकीट,सँनिटायझर,हँडग्लोज, मास्क,आरसेनिक गोळ्या आदी वस्तू महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ससून प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सतिश गायकवाड यांनी केले .यावेळी सोफोश संस्थेला रोख रक्कमेचा धनादेश देण्यात आला.

या प्रसंगी जमावबंदी आयुक्त तथा ससुन रूग्णालय प्रशासकीय नियंत्रक एस.चोकलिंगम,माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,ससुन रुग्णालय अधिष्ठाता मुरलीधर तांबे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे,वैद्यकीय उप अधिक्षक डॉ.विजय जाधव,नगरसेवक योगेश समेळ,नगरसेविका मजुश्री खर्डेकर,नगरसेविका पल्लवी जावळे,माजी नगरसेवक दिलीप उबरकर,भाजप नेते संदीप खर्डेकर,नितिन परदेशी,गोविंद साठे,किशोर कुटे,राजकुमार पाटील,दलजीत सिंग रँक,राजू परदेशी,सनी सोनवणे,पप्पुशेठ कोठारी,विनोद बिराजदार,राहूल मेहता,गणेश लांडगे,बंडू भोसले,दिपक कदम,गोरख दुपारगुडे, आदी उपस्थित होते.

आजच्या संकटाच्या काळात एकमेकाची गरज ओळखून दानशुरानी ससून रुग्णालयास मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ यानी यावेळेस केले.
कोरोना महामारीत डॉक्टर्स आणी नर्सस अहोरात्र काम करुन रुग्णाची सेवा करीत आहेत त्यांच्या या कामाचे कौतुक करावे तितके थोडे आहे असे मत भाजप नेते संदीप खर्डेकर यानी व्यक्त केले.
कोरोनाचे संकट अजून काही काळ राहणारे आहे त्यामुळे ससून रुग्णालयास मदतीची अधिकची गरज असल्याचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यानी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सतिश गायकवाड यानी केले.