Good Cholesterol Level | शरीरात असे वाढवा Good Cholesterol, ‘या’ सवयींमध्ये ताबडतोब करा सुधारणा

पोलीसनामा ऑनलाइन – Good Cholesterol Level | गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol And Bad Cholesterol) असे शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. जर तुमच्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढू लागले तर हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका (Heart Attack And Risk Of Brain Stroke) वाढतो. बहुतेक लोक शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol Level) वाढवण्यासाठी विविध उपाय करतात.

 

जीवनशैलीत बदल (Lifestyle Changes) करून शरीरातील गुड कोलेस्टेरॉलचे प्रमाण (Good Cholesterol Level) वाढवू शकता. गुड कोलेस्टेरॉलला HDL आणि बॅड कोलेस्टेरॉलला LDL म्हणतात. चांगले कोलेस्ट्रॉल हृदयासाठी फायदेशीर असतात (Good Cholesterol Is Good For Heart). त्यामुळे रक्तातील अतिरिक्त चरबी (Excess Fat In Blood) कमी होण्यास मदत होते. शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते जाणून घेवूयात (Let’s Know What Is Needed To Increase The Level Of Good Cholesterol In Body)…

 

1. दररोज करा व्यायाम (Do Exercise Daily)

शरीरातील गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. रोज अर्धा तास व्यायाम करावा. तुम्ही चालणे, धावणे, जॉगिंग, पोहणे (Walking, Running, Jogging, Swimming) किंवा जिममध्ये जाऊन व्यायाम (Exercise) करू शकता.

 

2. आहारातून काढून टाका प्रोसेस्ड फूड (Eliminate Processed Food From Diet)

प्रोसेस्ड फूड म्हणजे ते पदार्थ, जे अगोदर तयार केले जातात आणि खूप दिवसांनी वापरले जातात. असे अन्न आहारातून ताबडतोब काढून टाका. कारण त्यात भरपूर ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट (Trans Fat And Saturated Fat) असते, ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढतात.

 

3. जास्त गोड खाऊ नका (Don’t Eat Too Much Sweets)

जास्त गोड न खाण्याचा प्रयत्न करा. कारण जास्त साखर खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी गोड पदार्थ टाळा.

 

4. स्मोकिंगपासून राहा दूर (Stay Away From Smoking)

वजन कमी (Weight Loss) करणे देखील खूप महत्वाचे आहे.
जर तुमचे वजन वाढले असेल तर तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.
यासोबतच धूम्रपान करू नये. कारण धूम्रपान केल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल कमी होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Good Cholesterol Level | increase good cholesterol level by do exercise never smoke control your weight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा