‘या’ पक्षाला अच्छे दिन ! कंपन्यांकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या देणग्यांचं प्रमाण 12 पट आहे.  कॉर्पोरेट कंपन्यांकडून भाजपाला सर्वाधिक देणग्या मिळत असतात याची आकडेवारी आता समोर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं (एडीआर) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला 437 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादीचा ‘तो’ सदस्य ४ जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार ! 

उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात समाजवादी पार्टीसोबत आघाडी करणाऱ्या बहुजन समाज पार्टीला 20 हजार रुपयांपेक्षा अधिकची देणगी मिळालेली नाही. बसपानं या संदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला लिखित स्वरुपात दिली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांना 20 हजारांहून अधिक रकमेच्या एकूण 4 हजार 201 देणग्या मिळाल्या आहेत. यातून मिळालेली रक्कम 469.89 कोटी इतकी आहे. यातील 437.04 कोटी रुपये एकट्या भाजपाला मिळाले आहेत. भाजपाला मिळालेल्या देणग्यांची संख्या 2,977 इतकी आहे.
भाजपाच्या तुलनेत काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांची संख्या आणि देणग्यांमधून मिळालेली रक्कम अतिशय कमी आहे. काँग्रेसला 777 देणग्यांच्या माध्यमातून एकूण 26.65 कोटी रुपये मिळाले आहेत. देशातील राष्ट्रीय पक्षांना 2017-18 मध्ये कॉर्पोरेट आणि व्यवसाय क्षेत्रातून एकूण 1,361 देणग्यांमधून 422.04 कोटी रुपये मिळाले. तर 2,772 वैयक्तिक देणग्यांच्या स्वरुपात 47.12 कोटी रुपये मिळाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांनी सर्वाधिक देणग्या भाजपाला दिल्या आहेत. या माध्यमातून भाजपाला 400.23 कोटी रुपये मिळाले आहेत. तर काँग्रेसला अवघे 19.29 कोटी रुपये मिळाले आहेत.