Good News : यावर्षी 53 % कंपन्या नव्या लोकांना देणार नोकर्‍या, 60 % वाढवतील सॅलरी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे 2020 च्या दरम्यान नवीन नोकर्‍यांमध्ये घसरण झाली होती. आता कर्मचार्‍यांच्या मागणीत अचानक वाढ दिसून येत आहे. अपेक्षा केली जात आहे की, 53 टक्के कंपन्या 2021 मध्ये नवीन कर्मचारी नियुक्त करतील. कोविड-19 महामारीने भारतासह आशिया पॅसिफिक क्षेत्रात अर्थव्यवस्थांना वाईट प्रकारे प्रभावित केले आहे. एका सर्वेच्या रिपोर्टनुसार, 2020 ची सुरुवात नव्या नोकर्‍यांसाठी खुप चांगली होती.

हेल्थकेयर-टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये नोकरीची संधी
प्रोफेशनल रिक्रूटमेंट सर्व्हिसेस कंपनी मायकल पेज इंडियाच्या टॅलेंट ट्रेंड्स 2021 रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2020 च्या दरम्यान नवीन नोकर्‍यांमध्ये 18 टक्के घट नोंदली गेली. सर्वेवर आधारित रिपोर्टनुसार, आता नोकर्‍यांच्या बाबतीत सुधारणा दिसू लागली आहे. भारतात सुमारे 53 टक्के कंपन्यांनी यावर्षी कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्यावर विचार करण्याबाबत म्हटले आहे.

55 टक्के कंपन्यांची बोनस देण्याची योजना
मायकल पेज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक निकोलस ड्यूमोलिन यांनी म्हटले की, टेक्नॉलॉजी आणि हेल्थकेयर सेक्टर्समध्ये लॉकडाऊनच्या दरम्यान सुद्धा आवश्यक नोकर्‍या दिसून आल्या. या कारणामुळे या क्षेत्रांमध्ये ह्यूमन रिसोर्सची मागणी अचानक वाढ होणार होती. ई-कॉमर्स आणि एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये नियुक्त्यांची स्थिती मजबूत राहिली. या सक्टर्समध्ये 2021 च्या दरम्यान सुद्धा नवीन नोकर्‍यांच्या भरपूर संधी असतील. टॅलेंट ट्रेंड्स 2021 रिपोर्टनुसार, भारतात 2021 साठी सकारात्मक स्थिती आहे. सर्वेमध्ये सहभागी 60 टक्के कंपन्यांनी यावर्षी सॅलरी वाढवण्याबाबत म्हटले आहे. तर, 55 टक्के कंपन्यांची बोनस देण्याची योजना आहे.

सर्वात जास्त हेल्थकेयर सेक्टरमध्ये वाढवली जाईल सॅलरी
सर्वे रिपोर्टनुसार, 43 टक्के कंपन्या एक महिन्याचा बोनस देण्याची योजना बनवत आहेत. रिपोर्टचे निष्कर्ष 12 आशिया पॅसिफिक बाजारात करण्यात आलेल्या सर्वेतून घेण्यात आले आहेत. यामध्ये 5,500 पेक्षा जास्त व्यवसाय आणि 21,000 कर्मचारी सहभागी आहेत, ज्यामध्ये 3,500 पेक्षा जास्त डायरेक्टर आहेत. रिपोर्टनुसार, हेल्थकेयर सेक्टरमध्ये सॅलरी सर्वात जास्त वाढण्याची अपेक्षा आहे. यामध्ये सरासरी 8 टक्केच वाढ होईल. यानंतर कंझ्युमर गुड्समध्ये 7.6 टक्के आणि ई-कॉमर्स/ इंटरनेट सेवांमध्ये 7.5 टक्के वेतनवाढ होईल.