7 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 4 – 4 हजार रूपये जमा, तुम्हाला मिळाले नसतील पैसे तर तात्काळ करा ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी असलेली सर्वात मोठी योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनाचा लाभ देशातील अनेक शेतकऱ्यापर्यंत पोहचला आहे. आता पर्यंत 7 कोटी 5 लाख शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचला. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जात आहेत. याचा सर्वात अधिक लाभ उत्तप्रदेशला मिळाला आहे. इतर शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यात सर्वात अधिक लाभ उत्तरप्रदेशच्या शेतकऱ्यांना मिळाला आहे. जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर कृषि अधिकाऱ्याला तुम्ही संपर्क करु शकतात. तेथून देखील तुम्हाला मदत मिळाली नाही तर तुम्ही कृषि मंत्रालयाचा हेल्पालाइन नंबर (011-23381092) वर संपर्क करु शकतात.

महाराष्ट्रातील 66.69 लाख शेतकऱ्यांना लाभ
उत्तर प्रदेशला या योजनेचा सर्वाधिक फायदा मिळत असून त्या नंतर गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. हरियाणा देखील 13.18 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. तर महाराष्ट्रात 66.69 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. गुजरातमध्ये 44.92 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला तर कर्नाटकमध्ये 34.74 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला.

या योजनेच्या लाभ काँग्रेसशासित राज्यांना देखील मिळाला आहे. यात पंजाबला 14.57 लाख शेतकऱ्यांना, राजस्थानमध्ये 49.53 लाख शेतकऱ्यांना तर छत्तीसगढ, मध्यप्रदेशमध्ये क्रमश: 12.24 लाख, 36.42 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

असा मिळवा योजनेचा लाभ
यासाठी शेतकऱ्यांना कृषि विभागात रजिस्ट्रेशन करावे लागले. लेखापालशी संपर्क साधा आणि व्हेरिफिकेशन करा. महसूलाचा रेकॉर्ड, बँक खाते नंबर द्या.

यांना मिळणार नाही लाभ
एमपी, एमएलए, मंत्री आणि महापौर यांना ते शेतकरी असले तरी याचा लाभ मिळणार नाही. केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी किंवा १० हजार अधिक पेंशन मिळणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
डॉक्टर, इंजिनियर, सीए, वकील यांची शेती असली तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर विभागाला कर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.