Coronavirus : दिलासादायक ! राज्यातील 970 पोलिसांनी केली ‘कोरोना’वर मात, आतापर्यंत 2221 बाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरलेले कोरोना योद्धे पोलीसच मोठ्या संख्येने त्याचे शिकार झाले आहेत. रोज कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांचा वाढता आकडा समोर येत असतानाच आतापर्यंत राज्यातील ९७० पोलिसांनी मात केल्याचे समोर आले आहे. त्यातील अनेक जण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन आता परत ड्युटीवर आले आहेत.

राज्यात गेल्या २४ तासात ११६ पोलीस कोरोना बाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित पोलिसांची संख्या २ हजार २११ झाली आहे. त्यात २४९ पोलीस अधिकारी आणि १ हजार ९६२ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यातील २५ पोलिसांचा मृत्यु झाला असून त्यात १ अधिकारी व २४ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. मुंबईमधील १६ पोलिसांचा मृत्यु झाला आहे.

कोरोना बाधित झालेल्यांपैकी ८३ पोलीस अधिकारी व ८८७ असे ९७० पोलीस कोरोनामुक्त झाले असून सध्या १६५ पोलीस अधिकारी व १ हजार ५१ पोलीस कर्मचारी यांच्यावर सध्या उपचार करण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like