खुशखबर ! डिसेंबर महिन्यापासून राज्यात ‘मेगाभरती’, जाणून घ्या कोण-कोणत्या विभागात ‘संधी’

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाइन – आज विविध विभागात रिक्त जागा असून त्या भरतीसाठी शासन ठोस पाऊल कधी उचलणार याची प्रतीक्षा विद्यार्थी करत होते. ती प्रतीक्षा आता संपली आहे. शिक्षण, आरोग्य, पोलीस, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, महसूलसह अन्य विभागात रिक्त असलेल्या ७२ हजार पदांची भरती डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. मंत्रालयातील महापरीक्षा सेलचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या पुढाकाराने त्यासंबंधी नियोजन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील सहा महिन्यात हि भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

डिसेंबर २०१९ पासून राज्यातील विविध विभागांमधील रिक्त भरण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तब्बल ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असून त्याबाबतची माहिती शासकीय कार्यालयाकडून मागविण्यात आली होती. या भरतीमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागातील परिचर व पर्यवेक्षक आणि डॉक्टरसह इतर रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या संबंधित १५ डिसेंबर नंतर वेळापत्रक देखील जाहीर होणार आहे. डिसेंबर अखेरीस पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरतीची प्रक्रिया सुरु होणार असून मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश विभागातील रिक्त पदांची भरती ही एकाचवेळी होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. तसेच महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्याने या भारतीप्रक्रियेस वेग येणार असण्याची शक्यता आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डमधील रिक्त असलेल्या पदांच्या भरतीसाठी डिसेंबर अखेर अर्ज मागविण्यात येतील असे समजते.

काही ठळक बाबी –
– पशुसंवर्धन व महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डमधील रिक्त पदांच्या भारतीपासून होणार मेगाभरतीला सुरुवात
– जिल्हा परिषद, आरोग्य आणि पोलीस विभागात १५ डिसेंबर नंतर रिक्त पदांच्या भरतीचे नियोजन
– महापरीक्षा सेलच्या नियोजनानुसार २७ हजार रिक्त पदांची भरतीप्रक्रिया जून २०२० पर्यंत होणार पूर्ण
– बहुतांश विभागातील रिक्त पदांची भरती होणार एकाचवेळी; सर्वांना संधी मिळणार
– पशुसंवर्धन विभागात आठ हजार रिक्त पदांसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज

महापरीक्षा सेलने मागितली रिक्त पदांची माहिती
राज्य शासनाच्या विविध विभागात असलेल्या रिक्त पदांची माहिती महापरीक्षा सेलकडून मागविण्यात आली असून महापरिक्षा सेलच्या माध्यमातून मेगाभरती प्रक्रिया सुरु आहे. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरु होतील असे नियोजन देखील महापरीक्षा सेलने केली आहे.
– सीताराम कुंटे, अव्वर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन, मुंबई

Visit : Policenama.com