लग्नसराईपुर्वीच सोन्या-चांदीच्या दरात गेल्या 2 वर्षातील सर्वात मोठी ‘घट’, 1800 रूपयांची ‘घसरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण दागिने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे. कारण सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मंदीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती 10 ग्रॅम प्रति 180 रुपये तर चांदीच्या किमती 1800 रुपयांनी घसरल्या.

सोमवारी बाजार सुरु झाला तेव्हा सोन्याचा भाव 38920 रुपये होता आणि शनिवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव दहा ग्रॅम 38740 रुपयांवर पोहचला. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावावरही परिणाम झाला. सोमवारी चांदीची किंमत 46575 रुपये होती तर शनिवारी बाजार बंद होईपर्यंत 44875 रुपये झाली.

180 रुपयांच्या सोन्याच्या किंमतीत घसरण

या आठवड्यात सोन्याच्या किमती 180 रुपयांनी घसरल्या. शनिवारी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 38740 रुपयांवर पोहोचली. चांदीची 46775 रुपये या सर्वोच्च आणि 44850 रुपये न्यूनतम किमतींने विक्री झाली. याचवेळी, जागतिक बाजारपेठेतील सोने 1459.00 डॉलर्स आणि चांदीची 16.76 सेंट प्रति औंस विक्री झाली.

या कारणामुळे सोने-चांदी स्वस्त –

बाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापारी युद्धाच्या कारणामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला. स्थानिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरल्याने सोनं स्वस्त झाले.

Visit : Policenama.com