लय भारी ! Online न दिसता Whatsapp वर करा मजेशीर चॅटिंग, जाणून घ्या ही ‘ट्रिक’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – Whatsapp या मेसेजिंग अ‍ॅपचा वापर जगभरात कोट्यावधी युजर्स करतात. व्हॉट्सअ‍ॅपवर समोरच्या व्यक्तीला मेसेज केल्यावर आपण ऑनलाईन आहोत की ऑफलाईन याची माहिती मिळते. तसेच लास्ट सीनच्या माध्यमातून यापूर्वी किती वाजता समोरची व्यक्ती अथवा नातेवाईक, मित्रमैत्रिणी ऑनलाईन होते याची माहिती मिळू शकते. मात्र काही लोकांना आपण ऑनलाईन आहोत ते इतरांना समजायला नको असे वाटत असते. अनेक जण ऑनलाईन आल्याच दिसू नये, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेज वाचत नाहीत. एखाद्याशी चॅटिंग करताना, इतरांना आपण ऑनलाईन आहोत, हे समजू नये यासाठी एक ट्रिक आहे. या ट्रिकद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना युजर Online दिसणार नाही. यासाठी तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

पहिली पद्धत
1) यात स्मार्टफोनच्या नोटिफिकेशन विंडोचा वापर करता येईल.
2) ज्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येतो, त्यावेळी फोनवर त्याचे नोटिफिकेशन येते.
3) जर तुमचा फोन जास्त जुना नसेल, तर मेसेजखाली Reply चा पर्यायही मिळतो.
4)  या ऑप्शनमध्ये जाऊन, व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताच मेसेजला उत्तर देता येते. .
5) असे केल्याने  युजरच्या Last seen स्टेटसमध्ये कोणताही बदल होणार नाही.  इतरांना तुम्ही ऑनलाईन आला आहात, याची माहिती मिळणार नाही.

दुसरी पध्दत
1) स्मार्टफोनचा मोबाईल डेटा अन्  वायफाय कनेक्शन बंद करावे लागेल.
2)  त्यानंतर WhatsApp ओपन करुन, त्या मेसेज किंवा चॅटवर जा, ज्याला Reply करायचा आहे.
3) मेसेज टाईप करुन पाठवा, या परिस्थितीत मेसेज सेंड होणार नाही.
4) आता व्हॉट्सअ‍ॅप बंद करा आणि स्मार्टफोनचे इंटरनेत पुन्हा सुरु करा. त्यानंतर  मेसेज सेंड होईल आणि तुम्ही ऑनलाईनही दिसणार नाही.