खुशखबर ! ‘कोरोना’बाधित 3 भारतीयांवर ‘या’ जुन्या पध्दतीनं झाले ‘यशस्वी’ उपचार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना व्हायरसच्या संकटकाळात एक खुशखबर अशी की, अमेरिकेत राहणारे तीन भारतीय जे कोरोनाने गंभीर स्वरूपात संक्रमित होते. ते आता बरे झाले आहेत. तेही पूर्णपणे. उपचाराची पद्धत देखील वैद्यकीय शास्त्राची अत्यंत पारंपरिक आणि विश्वासात्मक पद्धत आहे.

वैद्यकीय विज्ञानाची ही टेक्निक अत्यंत मूलभूत आहे. संपूर्ण जग त्याचा वापर करू शकते. हे खरोखर फायदेशीर दिसत असून ते विश्वासार्ह देखील आहे. शास्त्रज्ञ जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या या टेक्निकला ‘कोव्हेलेसेंट प्लाझ्मा’ म्हणतात.

अमेरिकेतील वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी एकत्रितपणे ही पद्धत वापरली असून त्यांचा असा विश्वास आहे की उपचारांची ही पारंपारिक पद्धत अत्यंत प्रभावी आहे. कोव्हेलेसेंट प्लाझ्मा तंत्रज्ञानाद्वारे अनेक आजार बरे केले गेले आहेत. यात जुन्या बऱ्या झालेल्या रूग्णांचे रक्त नवीन रुग्णांच्या रक्तामध्ये टाकून रोग प्रतिकारशक्ती वाढवली जाते.

अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये असलेल्या बेलर सेंट ल्युक मेडिकल सेंटरमध्ये पाच लोक भरती होते. हे सेंटर चालवणाऱ्या बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनचे उपाध्यक्ष अशोक बालासुब्रमण्यम म्हणाले की आम्ही पाचही लोकांचा उपचार कोव्हेलेसेंट प्लाझ्मा पद्धतीने केला आहे. पाचही जण आता ठीक आहेत.

अशोक यांनी सांगितले की, आमच्या कॉलेजला क्लिनिकल ट्रायलची परवानगीही मिळाली आहे. आम्ही पुढच्या आठवड्यापासून याची सुरूवात करणार आहोत. यापूर्वी बरे झालेले पाच लोक, त्यापैकी तीन भारतवंशी आणि दोन अमेरिकन आहेत. आता आम्ही इतरांच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन लोकांना बरे करणार आहोत. मग त्यांच्या रक्तातून प्लाझ्मा घेणार. या पद्धतीला असेच पुढे नेणार आहोत.

अशोक म्हणाले की कोरोना व्हायरसची लस होण्यासाठी सुमारे १२ ते १८ महिने लागतील. तोपर्यंत ही पद्धत लोकांना वाचवण्यासाठी उत्तम आहे. ही पद्धत आशियाई देशांमध्ये बर्‍याच वर्षांपासून प्रचलित आहे.

द फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने अद्याप तरी या पद्धतीला कोरोनाच्या उपचारासाठी प्रमाणित केलेले नाही, पण या पद्धतीने इतर आजारांचे उपचार होत आले आहेत.

याअगोदर, चीनच्या द शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटलने उपचाराच्या या पद्धतीचा रिपोर्ट २७ मार्चला प्रकाशित केला होता. हॉस्पिटल व्यवस्थापनाने सांगितले की, कोरोनाच्या जुन्या रूग्णांच्या रक्ताने उपचार घेतलेल्या पाच रुग्णांचे वय ३६ ते ७३ वर्षांच्या दरम्यान होते.

या टेक्निकमध्ये रक्ताच्या आतील व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी बनून जाते. ही अँटीबॉडी व्हायरसशी लढून त्यांना मारून किंवा दाबून टाकते. शेनझेन थर्ड हॉस्पिटलमध्ये संक्रमक आजारांच्या अभ्यासासाठी नेशनल क्लिनिकल रिसर्च सेंटर देखील आहे.

चीनच्या रुग्णालयाचे उपसंचालक लियू यिंगजिया म्हणाले की आम्ही ३० जानेवारीपासून कोरोनाने बरे झालेल्या रूग्णांचा शोध सुरू केला होता. त्यांचे रक्त घेऊन नंतर त्यातून प्लाझ्मा काढून स्टोअर केले. जेव्हा नवीन रुग्ण आले तेव्हा त्यांना या प्लाझ्माचा डोस देण्यात आला.