दिलासादायक ! ‘कोरोना’च्या रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 31 ते 32 % : भारत सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगभर कोरोनाचा कहर सुरू असतानाच भारतात काही प्रमाणात सकारात्मक वातावरण आहे. कोरोना बाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात या आजारातून बरं होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही Positive news आहे. कोरोनाला रोखणं अवघड असलं तरीही हा आजार उपचारांमुळे बरा होतो आणि रुग्ण घरी जातात हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ही उदाहरणं आहेत.

देशात कोरोनाची संसर्ग वाढण्याचं प्रमाण 31-31 टक्क्यांपर्यंत पोहोचलं असून तितकेच टक्के लोक बरं होऊ घरी जात आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी दिली. ते म्हणाले,’जो लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यापैकी केवळ 5 टक्के रुग्णांनाच ICU, ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत आहे ही बाबही सकारात्मक आहे. भविष्यात परिस्थिती बदलू शकते त्यामुळे त्याची तयारीही सर्व सरकारी रुग्णालयांत करण्यात आली आहे.’ ही बातमी नक्कीच नागरिकांना दिलासा देणारी आहे.